प्रबोधन गुरुदक्षिणा चषक खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत गांधी अकादमी संघाने विहंग क्रीडा मंडळावर १४-१२ अशी मात केली. अनिकेत पोटे, दीपक माधव आणि दीपेश मोरे या वेगवान त्रिकुटाने गांधी अकादमीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. गांधी अकादमी संघाने अडखळत सुरुवात केली. मात्र तरीही त्यांनी सात प्रतिस्पध्र्याना बाद केले आणि संरक्षण करताना पाच मोहरे गमावले. ७-४ ही आघाडी १४-४ अशी वाढवली. गांधी अकादमी संघाने साखळीतले तिन्ही सामने जिंकण्याची किमया केली. अनिकेत पोटेने २.००, १.२० मिनिटे संरक्षण करताना एक गडी बाद केला. दीपक माधवने २.१०, २.०० मिनिटे संरक्षण करताना एक गडी बाद केला. विहंग मंडळाचा मनोज पवार स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू ठरला. गांधी अकादमीचा दीपेश मोरे सवरेत्कृष्ट संरक्षक तर श्री सह्य़ाद्री संघाचा संतोष नार्वेकर सवरेत्कृष्ट आक्रमकपटू ठरले.
महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी अजिंक्य
प्रबोधन गुरुदक्षिणा चषक खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने जेतेपदावर नाव कोरले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 03-05-2016 at 04:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi sports academy won kho kho tournament