बंगळुरू येथे २४ नोव्हेंबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, महेंद्र राजपूतकडे पुरुष संघाचे तर किशोरी शिंदेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. १६ सदस्यीय हा संघ आष्टी (बीड) येथे सराव करत असून, चार दिवसांनंतर अंतिम १२ जणांच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
पुरुष संघ : कर्णधार महेंद्र राजूपत (धुळे), काशिलिंग आडके, भागेश भिसे (सांगली), रिशांक देवाडिगा, सय्यद जहागीर, नामदेव इस्वलकर (उपनगर), विराज लांडगे, गोकुळ शितोळे, विकास काळे (पुणे), नीलेश साळुंके, उमेश म्हात्रे (ठाणे), विशाल माने (मुंबई), सतीश खांबे, स्वप्निल शिंदे (रत्नागिरी), राजेंद्र देशमुख (रायगड), मयुर मोटे (बीड). मार्गदर्शक : डॉ. माणिक राठोड, व्यवस्थापक : मनोहर धोंडे (बीड)
महिला : कर्णधार किशोरी शिंदे, स्नेहल शिंदे, दीपिका जोसेफ, पूजा शेलार, सायली केरीपाळे (पुणे), कोमल देवकर, अभिलाषा म्हात्रे (उपनगर), सुवर्णा बारटक्के, अपेक्षा टाकळे (मुंबई), ललिता घरट (रत्नागिरी), हर्षला मोरे (ठाणे), सोनू जायभाये (औरंगाबाद), गौरी पाटील (सांगली), पूनम पाटील (नाशिक), प्रगती मुसळे (रायगड), स्वाती पाटील (पालघर). मार्गदर्शक : अनंता शेळके, व्यवस्थापिका : कोमल चोथे.

Story img Loader