भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते. काही दिवसांपूर्वीच त्याने मर्यादित क्रिकेट कर्णधारपद सोडले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या नेतृत्वाची पराभवाने अखेर झाली; पण तरीही यापुढे एक खेळाडू म्हणून मला क्रिकेटमध्ये आनंद लुटत राहील, असे मत धोनीने व्यक्त केले. धोनी आपला लाडका सहकारी युवराज सिंगबरोबर ‘व्हिडीओ चॅट’ करत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंतच्या कर्णधारपदाच्या प्रवासाबद्दल धोनी म्हणाला की, ‘‘कर्णधारपदाचा प्रवास हा अद्भुत असाच होता. युवराजसारखे चांगले खेळाडू माझ्या संघात होते, त्यामुळे मला ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलवता आली. दहा वर्षांमध्ये मी कर्णधारपदाचा मनमुरादपणे आनंद लुटला. आता यापुढे मला क्रिकेटचा आनंद मिळतच राहील.’’

धोनीमधून अजूनही क्रिकेट संपलेले नाही. सराव सामन्यातही अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत धोनीने आपल्यामधील क्रिकेट संपलेले नाही हे दाखवून दिले. याबाबत धोनी म्हणाला की, ‘‘जर चेंडू योग्य ठिकाणी पडला तर मी नक्कीच षटकार ठोकू शकतो; पण त्या वेळी नेमकी परिस्थिती कशी असेल हे महत्त्वाचे आहे.’’

या वेळी युवराज म्हणाला की, ‘‘तू सर्वकालीन महान कर्णधार होतास. तुझ्या नेतृत्वाखाली खेळताना मजा आली. तुझ्या नेतृत्वाखाली भारताला दोन विश्वचषक जिंकता आले, त्याचबरोबर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. मला संधी दिल्याबद्दल तुझे आभार मानायलाच हवेत.’’

धोनीचे नेतृत्व अफलातूनच – बिलिंग्स

धोनी केवळ भारतात नव्हे तर जागतिक स्तरावरील वलयांकित खेळाडू आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द अफलातून अशीच आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने साकारलेली खेळी त्याच्यातील अजून अनेक वर्षांचे क्रिकेट शिल्लक असल्याची ग्वाही होती. धोनीला कर्णधार म्हणून खेळताना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. एखाद्या सराव सामन्याला इतकी गर्दी होणे दुर्मीळ आहे, असे इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्सने धोनीबद्दल सांगितले.

धोनीच्याच सल्ल्यामुळे फलंदाजी बहरली – रोहित

नवी दिल्ली : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मला सलामीला पाठवण्याचा निर्णय भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाच होता. त्यामुळेच माझी फलंदाजी बहरली व भरवशाचा सलामीवीर म्हणून माझ्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली, असे सलामीवीर रोहित शर्माने सांगितले.

रोहित पुढे म्हणाला, ‘प्रतिकूल परिस्थिती, खेळपट्टी व गोलंदाजी असताना त्यास आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे हे मी धोनीकडून शिकलो. त्यामुळेच मला माझ्या खेळातील उणिवा दूर करण्यास मदत झाली. धोनी जसा आक्रमक खेळ करतो, तशी शैली आपणही विकसित करावी अशी मला इच्छा झाली व त्याचा फायदा माझी फलंदाजी अधिकाधिक परिपक्व होण्यास मदत झाली.’

यावेळी रोहितने धोनीबरोबरची एक आठवणही सांगितली. ‘२०१३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने मला सलामीला पाठवण्याचा आदेश दिला. मला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला. पण, तू सलामीला यशस्वी होशील असे त्याने आत्मविश्वासाने सांगितल्यामुळे माझा उत्साह वाढला व धडाकेबाज ८० धावा केल्यामुळे आक्रमक सलामीवीर म्हणून मला लोकप्रियता मिळाली.’

‘प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत कधी तरी अपयशाचा काळ येत असतो मात्र त्यामुळे खचून न जाता हा काळ कसा पटकन जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असाही सल्ला धोनीने मला दिला. सहकारी खेळाडूंमधील गुणदोष झटकन ओळखण्याची क्षमता त्याच्याकडे आहे व मला त्याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे,’ असेही रोहितने सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्यावेळी रोहितला मोठी दुखापत झाली होती. त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करावी लागली व तो सध्या तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत रोहित म्हणाला, ‘दुखापत होणे हे आपल्या हातात नसते. मात्र न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ तीन अर्धशतके झळकाविल्यानंतर मला ही दुखापत झाली व मालिकेतून माघार घ्यावी लागली, त्यामुळेच मी निराश झालो. अर्थात हादेखील कारकीर्दीतील एक टप्पा असतो. काही वेळा अशा सक्तीच्या विश्रांतीची गरज असते.’