MS Dhoni playing golf with Donald Trump video viral: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या अमेरिकेत आहे, जिथे तो यूएस ओपन पुरुष एकेरीचा उपांत्यपूर्व सामना पाहण्यासाठी आला होता. गुरुवारी धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये धोनी अल्काराज आणि झ्वेरेव यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा आनंद घेत होता. मोठे केस आणि दाढी असलेला एमएस धोनी प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहत होता. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना माहीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत आहे.
धोनीने ट्रम्पसोबत गोल्फ खेळण्याचा लुटला आनंद –
मिळालेल्या माहितीनुसार, एमएस धोनी आणि डोनाल्ड ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब बेडमिन्स्टरमध्ये गोल्फ खेळले. हितेश सांघवीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून धोनीचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो डोनाल्ड ट्रम्पसोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गोल्फ विथ धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव. आम्हाला होस्ट केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष महोदय आभार.” धोनीच्या या फोटोशिवाय त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये धोनी गोल्फचा शॉट मारताना दिसत आहे.
खरंतर धोनी सध्या अमेरिकेत आहे. यूएस ओपनचे सामने पाहण्याबरोबरच त्याने गोल्फचाही आनंद लुटला. यादरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील धोनीसोबत दिसले. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताच्या माजी कर्णधाराला अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींनी ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब, बेडमिन्स्टर येथे गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले होते.
धोनी आणि ट्रम्प एकत्र खेळले गोल्फ –
धोनीचा जवळचा सहकारी आणि उद्योगपती हितेश संघवीने आपल्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये धोनी आणि ट्रम्प दोघेही एकत्र गोल्फ खेळताना दिसत आहेत. दुबईस्थित उद्योगपती संघवी एमएस धोनीसोबत होता आणि त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारताच्या माजी कर्णधारासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.