भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फार्म हाऊसमध्ये चेतकनंतर आणखी एक घोड्याची एन्ट्री झाली आहे. शेटलंड पोनी जातीचा हा घोडा बुधवारी स्कॉटलंडहून रांची येथे आला. यानंतर हा घोडा सिमलियातील धोनीच्या निवासस्थानी पोहोचला. २ वर्षाचा हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. त्याची उंची फक्त ३ फूट आहे. हा घोडा वेगासाठी नव्हे, तर केवळ सजावट आणि शोसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत खूप जास्त आहे.

हेही वाचा – ‘‘हे करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी कर”, ट्रोल झाल्यानंतर सौरव गांगुलीनं ‘ती’ पोस्ट हटवली

धोनीची मुलगी झिवा या घोड्यासोबत बराच वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने चेतक नावाचा घोडा घेतला होता, तो संबो येथील फार्म हाऊसमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षीने चेतकचे फोटो आणि व्हि़डिओ शेअर केले होते. धोनी आणि त्याच्या कुटुंबाला पाळीव प्राण्यांची आवड असून अनेक वेळा त्याच्याकडे असलेल्या या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

धोनीकडे असलेला चेतक घोडा ११ महिन्यांचा आहे आणि तो मारवाडी जातीचा आहे. काळा चेतक घोडा वेगवान हालचालींसाठी ओळखला जातो. बुधवारी शेटलंड पोनी जातीचा घोडा पांढऱ्या रंगाचा आहे. या घोड्यासाठी धोनीने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. या अतिशय सुंदर घोड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त आहे.

हेही वाचा – अवघ्या ५ दिवसांपूर्वी पदार्पण केलेल्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन!

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे.  धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.

Story img Loader