MS Dhoni’s Video Viral After Chandrayaan-3 Landing: बुधवारी (२३ ऑगस्ट) चांद्रयान-3 सह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. प्रत्येक भारतीयाने हा क्षण साजरा केला. त्याचवेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही हा क्षण साजरा केला. एमएस धोनीचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये धोनी हा खास क्षण साजरा करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये धोनी ब्लू ट्रॅक टॉप आणि जिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तो चांद्रयान-3 चे लँडिंग होताना अतिशय पाहताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी त्याच्या थाईने टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षीने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची मुलगी जिवा चांद्रयान-3 च्या लँडिंगचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

एमएस धोनी व्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केले. या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंतच्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहिले की, “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा.” याशिवाय किंग कोहलीने ट्विट केले की, “चांद्रयान-३ च्या टीमचे अभिनंदन. तुम्ही देशाचा अभिमान वाढवला आहे. जय हिंद!”

चंद्रावर पोहोचणारा भारत ठरला चौथा देश –

विशेष म्हणजे चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहेत. त्याच वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. उल्लेखनीय म्हणजे, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने संध्याकाळी ६.०४ वाजता सॉफ्ट लँडिंग केले होते.

हेही वाचा – चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होताच टीम इंडियाने डब्लिनमध्ये केला जल्लोष, BCCI ने शेअर केला खेळाडूंचा सुंदर व्हिडीओ

१४ दिवसांची मोहीम

ISRO ने दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरमधून रोव्हर बाहेर आल्यानंतर आता तो पुढचे १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वाटचाल करणार आहे. या दरम्यान जेव्हा उन असेल तेव्हा रोव्हरला सौर उर्जा मिळणार आहे. १४ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार होईल ज्यानंतर लँडर आणि रोव्हर दोघांचंही काम थांबेल.