Mahendra Singh Dhoni shared a video of celebrating his 42nd birthday: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी आपला ४२ वा वाढदिवस साजरा केला. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार धोनी सोशल मीडियावर फारच कमी सक्रिय राहतो. पण वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये माही त्याचा खास दिवस त्याच्या खास मित्रांसोबत सेलिब्रेट केला आहे. हे खास मित्र दुसरे कोणी नसून त्याचे पाळीव कुत्रे आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्यांचे आभार मानले –
महेंद्रसिंग धोनीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या पाळीव कुत्र्यांसह वाढदिवसाचा केक कापला. माहीने स्वत: केक खाण्यापूर्वी आपल्या प्रिय साथीदारांना केक खाऊ घातला. धोनीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- “तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, मी माझ्या वाढदिवशी जे केले त्याची एक झलक.”
धोनीचे घर आहे अलिशान –
एम एस धोनीकडे रांची आणि देहरादूनमध्ये कोट्यावधू रुपयांचे घर आहे. धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत झारखंडच्या रांची येथील फार्महाऊसमध्ये राहतो. रांचीमध्येच धोनीने ४३ एकरचा फार्महाऊस बनवला आहे. तिथे धोनी ऑर्गेनिक फार्मिंग करतो. तसंच हॉटेल माही रेसिडन्सी आणि ऑर्गेनिक फार्मिंगचाही समावेश आहे. हे हॉटेल धोनीच्या होमटाऊन म्हणेजच रांचीत आहे.
आयपीएलमधून कमावले कोट्यावधी रुपये
क्रिकेटच्या माध्यमातून एम एस धोनी जगभरात लोकप्रिय झाला. क्रिकेटच्या मैदानासोबतच बिजनेस सेक्टरमध्येही धोनीनं यश संपादन केलं आहे. क्रिकेटमधून पैशांची कमाई करण्याबरोबरच धोनीच्या कंपनींच्या माध्यमातूनही आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. धोनी आयपीएल टीम (IPL Team) सीएसकेचा (CSK) कर्णधार म्हणून १२ कोटी रुपये मानधन घेतो. मागील १६ आयपीएल सीजनमध्ये धोनीने फक्त क्रिकेटच्या माध्यमातून जवळपास १७८ कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा – MS Dhoni: ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ गाणं गाताना दिसला धोनी, मोहित शर्माने शेअर केला VIDEO
एमएस धोनीने आपल्या १५-१६ वर्षांच्या कारकिर्दीत बरेच काही केले, ज्यानंतर त्याचे नाव आज भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून घेतले जाते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवले. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही. १५ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी अचानकपणे आपल्या शैलीत धोनीने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले.