Mahendra Singh Dhoni was criticized for playing to a draw in the 2011 Dominica: भारतीय क्रिकेट संघ आजपासून म्हणजेच बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. पहिला कसोटी सामना डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला जात (विंडसर पार्क, रोसेओ, डॉमिनिका) आहे. भारतीय संघ १२ वर्षांनंतर डॉमिनिकाला परतला आहे. सध्याच्या भारतीय संघात आता फक्त दोन सदस्य आहेत, जे २०११ च्या डॉमिनिका कसोटीत भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग होते.
ते दोन सदस्य आहेत विराट कोहली आणि राहुल द्रविड. त्या सामन्यात तत्कालीन कर्णधार एमएस धोनीच्या चुकीमुळे विजयी सामना अनिर्णित राहिल्याचे म्हणले जाते. कोहली त्यावेळी तरुण आणि उगवता स्टार होता, पण आता तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातला एक वरिष्ठ फलंदाज आहे. त्याचवेळी, द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता आणि आता तो भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
२०११ मध्ये काय झाले होते –
२०११ मध्ये, भारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. किंग्स्टनमधील पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती, तर पुढील दोन कसोटी अनिर्णित राहिल्या होत्या. जर तत्कालीन कर्णधार एमएस धोनीची इच्छा असती, तर भारताला डॉमिनिका येथील तिसरी कसोटीही जिंकता आली असती. पण तो अनिर्णीत करण्यासाठी खेळला आणि भारताला मालिका १-० अशी जिंकावी लागली. धोनीच्या या निर्णयावर भारतीय चाहत्यांकडून आजही टीका होते.
हेही वाचा – IND vs WI 1st Test: टीम इंडियासाठी इशान-यशस्वी खेळणार डेब्यू मॅच, पाहा दोघांची आतापर्यंतची आकडेवारी
२०११ ची डॉमिनिका कसोटी महेंद्रसिंग धोनीसाठी लक्षात राहते, ज्याने विजय मिळवण्यासाठी न खेळता ड्रॉ करणे योग्य मानले. जरी भारताने कसोटी मालिका जिंकली असली, तरी त्या दिवसात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) गुण पणाला लागले नव्हते.
६ ते १० जुलै २०११ दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात डॉमिनिका येथे तिसरी कसोटी खेळली गेली. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २०४ आणि दुसऱ्या डावात ३२२ धावांत आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३४७ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्यांना विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्या काळात टी-२० क्रिकेटचा दबदबा होता आणि त्या संघातील अनेक भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते.
हेही वाचा – IND vs WI: ‘…म्हणून अनिल कुंबळेने जबडा तुटला असताना केली होती गोलंदाजी’; पत्नीला वाटलं होतं मस्करी करतोय
सामन्यानंतर काय म्हणाला होता धोनी?
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्रसिंग धोनीने जिंकण्यासाठी न खेळता ड्रॉसाठी खेळण्यास सांगितले होते. माही म्हणाला होता, “आम्ही लक्ष्याच्या मागे जाऊन मालिका जिंकण्याची जोखीम पत्करत होतो, त्या विकेट्सनंतर असे करणे योग्य नव्हते हे आम्हाला समजले होते. आम्ही प्रयत्न केले पण मालिका जिंकल्याने आम्ही आनंदी आहोत.”