Ishant Sharma on MS Dhoni: क्रिकेट जगतात एम.एस. धोनीची प्रतिमा कॅप्टन कूल अशी बनलेली आहे. प्रेशर सामन्यांच्या परिस्थितीतही तो अगदी शांत दिसतो, जेव्हा जेव्हा कॅमेरा त्याच्यावर असतो तेव्हा धोनीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नसते. मात्र, जेव्हा कॅमेरा त्याच्यापासून दूर असतो तेव्हा तो खेळाडूंकडे खूप लक्ष देतो. अनेक खेळाडूंनी त्याच्याबद्दल अशा गोष्टी सांगितल्या आहेत पण अलीकडेच इशांत शर्माने खुलासा केला आहे की, “माही मैदानावर खूप चिडचिड करतो.”
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्याचा खुलासा केल्यानंतर, इशांत शर्माने एम.एस. धोनीच्या ‘कॅप्टन कूल’ टॅगवर आणखी एक मोठे विधान केले आहे. भारताचा माजी कर्णधार मैदानावर नेहमी शांत राहतो यासाठी त्याचे कौतुक केले जाते. मात्र, इशांतने खुलासा केला की, “धोनीने काही वेळा आपला संयम गमावला आहे. जेव्हा मी गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथमध्ये चूक केली आहे तेव्हा त्याने मला शिवीगाळही केली आहे. मात्र त्याच्या शिव्या या फार मनाला लागणाऱ्या नसतात. तो खूप प्रेमळ आहे.” असा त्याने त्या पॉडकास्टमध्ये एका मुलाखतीत सांगितले.
खरं तर, रणवीर अल्लाबदियासोबतच्या पॉडकास्टदरम्यान, इशांतने धोनीचा कूल टॅग फेटाळून लावला आणि म्हणाला, “शांत कूल तो नहीं हैं, बहुत गाली देते हैं, मुझे भी बहुत दी है.” अगदी अलीकडच्या काळात, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असताना, धोनी अनेकदा खेळाडूंवर आणि कधी सामना अधिकाऱ्यांवर भडकताना दिसला आहे. फरक एवढाच आहे की माजी कर्णधार विराट कोहलीप्रमाणे धोनी आपल्या भावना फारशा दाखवत नाही.”.
जेव्हा इशांतला विचारण्यात आले की शांत आणि कूल असण्याव्यतिरिक्त सहा असे कोणते गुण हे एम.एस. धोनीकडे आहेत? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माही भाईची ताकद एक नाही तर अनेक आहेत. तो शांत नाही पण त्याची विचार करण्याची क्षमता ही इतरांपेक्षा खूप जास्त आहे, तो मस्तीखोर नाही. धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहे. कितीही यश मिळवले त्याने पण त्याला अजिबात गर्व नाही.”
मी त्याचा खूप ऋणी आहे, मी गंमत करतोय. मी त्याच्या धाकट्या भावासारखा असून तो नेहमी माझ्याशी चांगलाच वागला आहे. कधी कधी चिडला पण त्याच्या मनात काहीही नसते. एकदा मी त्याला विचारले की तू मला इतक चिडवतोस का? यावर तो म्हणाला की, मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच मी चिडवतो आणि शिव्या देतो. नाहीतर मी सगळ्यांना चिडवत नाही. यावर मी म्हणालो की मला माहित नाही पण तू माझा खरं मोठा भाऊ आहे. त्याच्या या उत्तराने मी पूर्णपणे भावूक झालो.”