Mahmudullah upset with Bangladesh selection committee: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक २०२३ चा २३वा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे महमुदुल्लाहची शतकी खेळी व्यर्थ ठरली. यानंतर बांगलादेशच्या निवड समितीच्या वर्तनावर एक शब्दही न बोलता वरिष्ठ फलंदाज महमुदुल्लाह म्हणाला की, सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु स्पर्धेच्या मध्यभागी मत व्यक्त करण्याची ही योग्य वेळ नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना महमुदुल्लाहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १११ धावांची शानदार खेळी खेळली, हे त्याचे चौथे एकदिवसीय शतक आणि गेल्या सहा वर्षांतील पहिले शतक आहे. मात्र, शकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील संघाला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. महमुदुल्लाहची फलंदाजी ही बांगलादेशसाठी स्पर्धेतील काही सकारात्मक बाबींपैकी एक आहे. कारण ते चार पराभवानंतर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत.

तो काळ चांगला होता –

महमुदुल्लाह मंगळवारी सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला, “तो काळ चांगला होता. त्या वेळेबद्दल मी काही सांगू शकत नाही. मला अनेक गोष्टींबद्दल बोलायचे आहे, पण बोलण्याची ही योग्य वेळ नाही. मी एवढेच म्हणेन की मला संघासाठी योगदान द्यायचे होते. त्यामुळे कदाचित अल्लाहने मला पुढे जाण्याची ताकद दिली असेल. मी माझा फिटनेस राखण्याचा प्रयत्न केला. मेहनत करत राहिलो. मी एवढेच करू शकतो.”
तो पुढे म्हणाला, “मी ही खेळी माझ्या कुटुंबाला आणि लोकांना समर्पित करते, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि गेल्या तीन महिन्यांत माझ्यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानू इच्छितो आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला नाही त्यांचे देखील आभार मानू इच्छितो.”

हेही वाचा – AUS vs NED: नाणेफेक जिंकून सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

३७ वर्षीय खेळाडूने सांगितले की, त्याला प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांनी सांगितले होते की त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावा. कारण बांगलादेशला मधल्या फळीत त्याच्या अनुभवाची गरज आहे. तो म्हणाला, “मी संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणे ठीक आहे. काल (सोमवार) प्रशिक्षकाने मला सांगितले की तू सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. त्यानंतर मी मैदानावर गेलो आणि माझा खेळी केली.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahmudullah said i want to talk about a lot of things about the ban selection committee but this is not right time to talk vbm