क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदी इंग्लंडचे माजी कप्तान माइक गॅटिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
५५ वर्षीय गॅटिंग मिडलसेक्सकडून काऊंटी क्रिकेट खेळले. एमसीसीच्या मालकीचे लॉर्ड्स मैदान हेच मिडलसेक्सचे मैदानी व्यासपीठ. १ ऑक्टोबरपासून गॅटिंग पदभार स्वीकारणार अहेत.
सध्याचे अध्यक्ष माइक गिफिथ यांनी गुरुवारी दुपारी एमसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गॅटिंग यांच्या नावाची घोषणा केली. लॉर्ड्स मैदान आणि मिडलसेक्ससाठीच्या संस्मरणीय वर्षांत गॅटिंग एमसीसीचे अध्यक्षपद सांभाळणार आहे.
गॅटिंगने १९७५मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत तो मिडलसेक्सकडूनच खेळला. त्याने ९४ शतके झळकावली आहेत आणि १५८ बळी घेतले आहे. याशिवय १९७८मध्ये कराचीत गॅटिंगने इंग्लंडकडून पदार्पण केले. तो देशासाठी ७९ कसोटी सामने खेळला. १९८६मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. त्याच्या कप्तानपदाच्या कारकीर्दीत इंग्लंडने २३ कसोटी सामन्यांपैकी फक्त २ विजय मिळवले. १९८६-८७मध्ये ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस मालिकेत ते विजय इंग्लंडने मिळवले होते.

Story img Loader