बिश्केक  : अनेक अडथळयांची आव्हाने पार करून ऑलिम्पिक कोटा मिळविल्याचा विनेश फोगट निश्चित आनंदी असेल, पण आता आराम करून चालणार नाही. ऑलिम्पिकपर्यंत पुढील चार महिने मला वजन राखण्याची कसरत करावी लागेल, असे मत विनेशने व्यक्त केले.

विनेशने वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर मात देत सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक कोटा मिळवला. कुस्ती महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकल्यानंतर जवळपास दीड वर्षे ती मॅट सरावापासूनही दूर राहिली होती. अशात तिच्या नेहमीच्या ५३ किलो वजनी गटातून अंतिम पंघालने ऑलिम्पिक कोटा मिळवला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळण्याच्या उद्देशाने पेटून उठललेल्या विनेशने वजनी गट बदलून ५० किलोमधून खेळण्याचा निर्णय घेतला. यातही पहिला अडथळा पार करताना विनेशने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. विनेश म्हणाली,‘‘ हे सारे अद्भुत आहे. मी कमालीची आनंदी आणि अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित झाली आहे. कठोर मेहनत घेऊन मी वजन ५० किलोपर्यंत खाली आणले आहे. आता पुढील चार महिने ते टिकवून ठेवण्याचे मुख्य आव्हान मला पेलावे लागणार आहे.’’

do patti
अळणी रंजकता
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
Loksatta article on Competitive Examination education
स्पर्धा परीक्षा देणं उत्तमच, पण किती काळ? पुढे काय?
Pune growing urbanization, PMPL, Pune metro,
सावध ऐका पुढल्या हाका…
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
School students bag, School students,
दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्केपेक्षा जास्त नको…
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

हेही वाचा >>> PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन

‘‘माझ्या शरीरातील पेशी झपाटयाने वाढतात. मी तंदुरुस्त दिसत असले, तरी माझ्याकडे पिळदार स्नायू असल्यामुळे वजन पटकन वाढते. मॅटवरील सरावाची मला चिंता नाही. माझ्याकडे फक्त चार महिने आहेत आणि काही करून मला वजन नियंत्रित करायचे आहे,’’ असेही विनेशने जागतिक कुस्ती महासंघाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘‘ऑलिम्पिक संघ निवडताना आता भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. मी देशासाठी ५० किलो वजनी गटात कोटा मिळविल्याचा मला आनंद आहे. आता मी ५० किलो की ५३ किलो वजनी गटातून ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे संघ निवड चाचणीतून निश्चित होईल,’’ असेही विनेश म्हणाली.