मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले. दक्षिण कोरियाच्या सोन वॅन हो याने त्याला २१-२३, २१-१६, २१-१७ असे पराभूत केले. अटीतटीचा झालेला पहिला गेम श्रीकांतने जिंकला होता. मात्र त्यापुढचे दोनही गेम त्याला गमवावे लागले. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

दुसरीकडे भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने महिला एकेरीत जपानच्या नोझुमी ओकुहारवर मात करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सायनाचा सामना कॅरोलिना मरीनशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने नोझुमी ओकुहारचा २१-१८, २३-२१ असा पराभव केला आहे.

Story img Loader