आघाडीवीर किमी रैक्कोनन याने मलेशियन ग्रां.प्रि. मोटार स्पर्धेतील सराव शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली. पावसातही त्याने अप्रतिम कौशल्य दाखविले. जागतिक स्पर्धेत २००७ मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या रैक्कोनन याने ही शर्यत एक मिनिट ३६.५६९ सेकंदात पार केली. मुसळधार पावसास न जुमानता त्याने वेग व नियंत्रण याचा सुरेख समन्वय दाखविला. रेड बुल संघाच्या सेबस्टीयन व्हेटेल याने दुसरा क्रमांक मिळविला. फेलिप मासा व फर्नान्डो अलोन्सो यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला. पहिल्या नव्वद मिनिटांत आघाडीवर असलेल्या मार्क बेवर याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Story img Loader