मलेशियाचा स्ट्रोक-मेकर हाफिज हाशिम, माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन, पीव्ही सिंधूला तिच्या ऑल इंग्लंड मोहिमेपूर्वी सुचित्रा अकादमीमध्ये मदत करेल, असे मलेशियातील द स्टार वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. सिंधूने तिच्या मोहिमेची सुरुवात झांग यिमान विरुद्ध केली आहे. ती ही बिंगजियाओ आणि ताई त्झू यिंग एक सारख्याच क्वार्टरमध्ये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नियुक्तीची पुष्टी करताना, सुचित्रा अकादमीचे प्रमुख प्रदीप राजू म्हणाले, “आम्हाला हे सुनिश्चित करायचे होते की आमच्या खेळाडूंना सुचित्रा येथे एक उत्तम प्रशिक्षक आहे. तो माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन आहे, जो सर्वोच्च स्तरावर खेळला आहे आणि कोणालाही हे ज्ञात आहे. या स्तरावरील आव्हानांचा सामना कसा करायचा आणि परिस्थितीशी जुळवून घेत जिंकायचे हे त्याला माहीत आहे.
द स्टारने म्हटले आहे की, हफीजने गेल्या वर्षीच्या अखेरीस मलेशियाच्या बॅडमिंटन असोसिएशन (बीएएम) च्या कनिष्ठ प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर हैदराबादमधील सुचित्रा बॅडमिंटन अकादमीकडून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची ऑफर स्वीकारली होती. प्रदीप राजू म्हणाले, “केवळ आमचे प्रशिक्षणार्थी नाही. इतरही आमच्या आधारावर त्याचे प्रशिक्षण घेण्यास तयार आहेत. गेल्या २० वर्षांत निवृत्त झालेल्या सर्वात बुद्धिमान खेळाडूंपैकी हाफिज एक आहे.” हाफिजने तौफिक हिदायत आणि लिन डॅनविरुद्ध विजय मिळवला होता.
४० वर्षीय हाफिजने द स्टारला सांगितले, “मला गेल्या वर्षी अकादमीचे संचालक प्रदीप राजू यांच्याकडून एक ऑफर मिळाली होती, पण मी ती नाकारली. कारण मी अद्याप बीएएमशी करारात आहे.” जो २०१८ पासून प्रशिक्षण देत आहे.
हाफिजने द स्टारला सांगितले, “मी तिचा प्रशिक्षक होणार नाही, पण माझा अनुभव सांगेन आणि तिला सर्व प्रकारे मदत करेन. सिंधू आता भारतीय राष्ट्रीय संघाचा एक भाग असली, तरी ती अजूनही आठवड्यातून एक किंवा दोनदा अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते.” रेशमी स्ट्रोक आणि गुळगुळीत फूटवर्कसाठी ओळखल्या जाणाऱ्या हाफिजने 2003 मध्ये ऑल-इंग्लंड जिंकले.
हेही वाचा – INDW vs AUSW: अंजुम चोप्राला मिठी मारताच हरमनप्रीतला आले रडू; या भावनिक क्षणाचा आयसीसीने शेअर केला VIDEO
त्याने अकादमीसोबत तीन वर्षांचा करार केला असून तो आधीच हैदराबादमध्ये आहे. हाफिजने सांगितले, ”मी या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे, जो परदेशात माझा पहिला कोचिंगचा कार्यकाळ असेल. हे एक चांगले आव्हान असेल कारण मला दुसर्या देशातील विविध प्रकारचे खेळाडू कसे हाताळायचे हे शिकण्याची गरज आहे. या नवीन असाइनमेंटमुळे मला एक चांगला प्रशिक्षक होण्याची आशा आहे.”