भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भात्यातील धावा मिळवून देणारा ‘हेलिकॉप्टर’ शॉटचा निर्माता, धोनीचा मित्र व माजी रणजीपटू संतोष लाल याचे बुधवारी पोटाच्या विकारावर उपचार सुरू असताना दिल्लीस्थित रूग्णालयामध्ये निधन झाले. बत्तीस वर्षीय संतोष लाल यांच्यापश्चात आईवडील, पत्नी व तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
बुधवारी रात्री त्यांचे पार्थीव रांचीमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेमध्ये कामाला असलेले लाल यांना पोटाचा त्रास वाढल्यावर १५ जुलै रोजी हवाई रूग्णवाहिकेतून उपचारासाठी दिल्लीमध्ये हलवण्यात आले होते.
झारखंड राज्य क्रिकेट मंडळाच्यावतीने उपचारांसाठी लाल यांना एक लाख रूपये मदत निधी देण्यात आला. त्याचबरोबर मंडळाच्या सदस्यांनी वैयक्तिक देणगीमधून गोळा केलेला ३९,५०० रूपयांचा निधी लाल यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. धोनी रांचीमध्ये असल्यावर नेहमी संतोष लाल यांना भेटण्यासाठी जात असे व त्यांनी शिकवलेल्या ‘हेलिकॉप्टर’ शॉटबद्दल त्याचे आभार मानत असे.

Story img Loader