शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक-२०२३ मधील भारत विरुद्ध पाकिस्तानचा बहुप्रतिक्षित सामना पार पडला. या सामन्यात भारताने एकतर्फी वर्चस्व राखत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण या सामन्यादरम्यान, एक प्रेक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणाला कानशिलात लगावल्यानंतर संबंधित तरुणानेही महिलेस उलट मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्टँडमध्ये बसलेला एक तरुण आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यात शारीरिक बाचाबाची झाल्याचं दिसून येत आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला? याची पुष्टी ‘लोकसत्ता’ करू शकली नाही. मात्र, गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला पोलिसाने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा- IND vs PAK: “…घाई करण्याची काय गरज होती?” गावसकर यांनी रोहित शर्माच्या कोणत्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली? जाणून घ्या

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्वीटर) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, महिला पोलीस गर्दीत बसलेल्या एका तरुणाला कोणत्या तरी कारणावरून फटकारताना दिसत आहे. राग अनावर झाल्यानंतर महिला पोलिसाने संबंधित तरुणाला कानशिलात लगावली. यानंतर संबंधित तरुणानेही महिला पोलिसाला उलट मारण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते महिला पोलिसाने तरुणाला चापट मारायला नको होती. तर काहींनी संबंधित तरुणाच्या कृतीचा निषेध केला आहे.