आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक मैत्रिपूर्ण स्पर्धेचा शेवट वेन रूनीने मँचेस्टर युनायटेडसाठी गोड केला. या दौऱ्यात पहिल्यांदाच रूनीला मँचेस्टरने कर्णधारपद दिले होते आणि अंतिम सामन्यात त्यांनी लिव्हरपूलवर ३-१ असा सहज विजय मिळवला.  लिव्हरपूलने १४ व्या मिनिटाला पहिला गोल करत आघाडी घेतली होती, पण सामन्याच्या ५५व्या मिनिटाला रूनीने गोल करत मँचेस्टरला लिव्हरपूलशी बरोबरी करून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनीच मँचेस्टरने दुसरा गोल करत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या ८८व्या मिनिटाला लिंगार्डने तिसरा गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘सामन्याबरोबरच स्पर्धा जिंकल्यामुळे आनंद झाला आहे. सराव करताना आम्ही अथक मेहनत घेतली होती, त्याचेच हे फळ आहे. पहिल्या सत्रात लिव्हरपूलने दमदार खेळ करत आघाडी घेतली होती. आमच्याकडून पहिल्या सत्रामध्ये वाईट कामगिरी झाली, पण आम्ही दर्जेदार कामगिरी करू शकतो, हा विश्वास होता. दुसऱ्या सत्रात लौकिकाला साजेशी कामगिरी करत आम्ही सामना जिंकला!’’            -वेन रूनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा