टेबल टेनिस स्पर्धा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
टेबल टेनिस स्पर्धा
बेलारुस खुल्या टेबल टेनिस स्पर्धेमधील २१ वर्षांखालील एकेरी गटात भारताच्या मानव ठक्कर याने कांस्यपदक पटकावले.
आतापर्यंत दमदार कामगिरीसह आगेकूच केलेल्या मानवला उपांत्य फेरीत रशियाच्या डेनिस इवोनिनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मानवने पहिला गेम ११-५ असा जिंकत चांगली सुरुवात केली. चौथ्या गेमला दोन्ही खेळाडूंची बरोबरी झाल्यानंतर निर्णायक पाचव्या गेमपर्यंत सामना खेचला गेला. त्यात अगदी अटीतटीच्या लढतीत मानवला ११-९ असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, भारताच्या हरमीतने रशियाच्या अॅलेक्सी लिव्हेनत्सोव्हवर ४-२ अशी मात करीत आगेकूच केली आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही भारताला पदकाची अपेक्षा आहे.