इस्तंबूल : मँचेस्टर सिटीचे क्लब फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ जिंकण्याचे स्वप्न अखेर साकार झाले. रॉड्रीने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर सिटीने तीन वेळच्या विजेत्या इंटर मिलानवर १-० अशी मात करत प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या करंडकावर आपले नाव कोरले.

चॅम्पियन्स लीग जिंकतानाच सिटीने एका हंगामात तिहेरी जेतेपदाचे ध्येयही साध्य केले. सिटीने या हंगामात प्रीमियर लीग, एफए चषक आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आणि एकाच हंगामात या तीन मोठय़ा स्पर्धा जिंकणारा सिटी हा मँचेस्टर युनायटेडनंतरचा (१९९९) दुसराच संघ ठरला.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?

नामांकित स्पॅनिश प्रशिक्षक पेप ग्वार्डियोला २०१६ सालापासून मँचेस्टर सिटीला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीने इंग्लिश फुटबॉलवर वर्चस्व गाजवले आहे. गेल्या सात वर्षांत सिटीने एकूण पाच वेळा आणि सलग तीन वेळा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले आहे. मात्र, सिटीला चॅम्पियन्स लीग जिंकण्यात अपयश येत होते. दोन वर्षांपूर्वी अंतिम सामन्यात सिटीला इंग्लिश संघ चेल्सीकडूनच पराभव पत्करावा लागला होता. मात्र, इंटरविरुद्ध योजनाबद्ध खेळ करताना सिटीने अखेर चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

सिटीचा संघ आक्रमक खेळासाठी, तर इंटरचा संघ भक्कम बचाव करताना संधी मिळताच प्रतिहल्ला करण्यासाठी ओळखला जातो. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंटरने अपेक्षेनुसारच खेळ केला. मात्र, सिटीला आक्रमक खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ६८व्या मिनिटाला मध्यरक्षक रॉड्रीने गोल झळकावत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, यानंतर फेडेरिको डिमार्को आणि रोमेलू लुकाकू यांना इंटरला बरोबरी साधून देण्यात अपयश आले. विशेषत: ८८व्या मिनिटाला लुकाकूला गोलजाळय़ाच्या अगदी समोरून गोल करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, त्याने मारलेला हेडर सिटीचा गोलरक्षक एडर्सनच्या पायाला लागून अडला. यानंतर अखेरच्या मिनिटाला रॉबिन गोसेन्सने मारलेला हेडरही एडर्सनने अडवत सिटीचा विजय सुनिश्चित केला.

ग्वार्डियोला यांची ऐतिहासिक कामगिरी

एकाच हंगामात तिहेरी जेतेपद मिळवण्याची कामगिरी दोनदा करणारे पेप ग्वार्डियोला हे पहिलेच प्रशिक्षक ठरले. सध्या सिटीचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या ग्वार्डियोला यांनी यापूर्वी बार्सिलोनाला (२००८-०९) मार्गदर्शन करताना तिहेरी जेतेपद मिळवले होते.

८ एकाच हंगामात युरोपीय स्पर्धेसह तिहेरी जेतेपद मिळवणारा मँचेस्टर सिटी हा एकूण आठवा संघ ठरला. बार्सिलोना (२००८-०९, २०१४-१५) आणि बायर्न म्युनिक (२०१२-१३, २०१९-२०) या संघांनी दोन वेळा ही कामगिरी केली आहे.

२ एकाच हंगामात प्रीमियर लीग, एफए चषक आणि चॅम्पियन्स लीग जिंकणारा मँचेस्टर सिटी हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी मँचेस्टर युनायटेडने १९९९मध्ये अशी कामगिरी केली होती.

४ चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवणारा मँचेस्टर सिटी हा चौथा इंग्लिश संघ ठरला. यापूर्वी मँचेस्टर युनायटेड (१९९९, २००८), लिव्हरपूल (२००५, २०१९), चेल्सी (२०१२, २०२१) यांनी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवले आहे.

१० एकाच हंगामात विश्वचषक आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवणारा ज्युलियन अल्वारेझ हा १०वा खेळाडू ठरला. क्लब फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्वारेझचा विश्वचषक विजेत्या अर्जेटिना संघात समावेश होता.