मँचेस्टर युनायटेड आणि वेस्ट हॅम युनायटेड यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटल्यामुळे मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी अद्याप काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  मँचेस्टर सिटीने विगानवर १-० असा विजय मिळवत जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.
रिकाडरे वाझ टे (१६व्या मिनिटाला) आणि मोहम्मद दियामे (५५व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे वेस्ट हॅमने आघाडी घेतली होती. पण अ‍ॅन्टोनियो व्हॅलेन्सिया (३१व्या मिनिटाला) आणि रॉबिन व्हॅन पर्सी (७७व्या मिनिटाला) यांनी मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून दिली. मँचेस्टर सिटी आणि विगान अ‍ॅथलेटिक्स यांच्यातील सामनाही रंगतदार झाला. दोन्ही संघांना अखेपर्यंत खाते खोलता आले नव्हते. अखेर कालरेस टेवेझने ८३व्या मिनिटाला केलेला गोल सिटीच्या विजयात निर्णायक ठरला.