भारत आणि इंग्लंड यांच्यातील रद्द झालेल्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये पुन्हा आयोजित केला जाईल, असे म्हटले जात होते. पण क्रिकअॅडिक्टरच्या वृत्तानुसार, हा सामना मँचेस्टरमध्ये होणे अवघड आहे. हा सामना पुढील वर्षी आयोजित केला जाणार होता. या वृत्तामुळे दोन्ही संघांची चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओल्ड ट्रॅफर्ड पुढील वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात पुनर्निर्धारित पाचवी कसोटी आयोजित करू शकणार नाही. दक्षिण आफ्रिका त्याच वेळी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज असल्याचे कारणा यापाठी असल्याचे समोर आले आहे. भारताने आपल्या संघातील करोनाच्या वाढत्या प्रकरणांशी संबंधित चिंतेमुळे मालिकेचा निर्णायक सामना खेळण्यास नकार दिला होता.

हेही वाचा – IPL 2021 : महेंद्रसिंह धोनी आता चेन्नईच्या जर्सीत दिसणार नाही?; सामन्यापूर्वी म्हणाला, ‘‘दोन नवीन संघ…”

स्पोर्ट्समेलमधील एका अहवालानुसार, मालिकेची शेवटची कसोटी आता इतरत्र खेळली जाईल. त्याच अहवालानुसार, लँकशायरला कसोटी सामना रद्द झाल्यानंतर सुमारे १० लाख पाऊंडचे नुकसान सहन करावे लागले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामना २४ जुलै रोजी होणार आहे, परंतू अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

ईसीबीची अद्याप बीसीसीआयशी अंतिम चर्चा झाली नाही. भारत पुढील वर्षी १ ते १४ जुलै दरम्यान मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १९ जुलैपासून सुरू होणार आहे, जी ३१ जुलै रोजी संपेल.