ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मुलाखतीने फुटबॉल विश्व हादरले आहे. रोनाल्डोने विशेषतः रोनाल्डोने विशेषतःमँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक यांच्यावर जोरदार टीका केल्याने त्याची लवकरच क्लबमधून हकालपट्टी होऊ शकते. रोनाल्डो सध्या २० तारखेपासून सुरू होणाऱ्या कतार येथील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. रोनाल्डो हा व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.

फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सुपरस्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत सुमारे १.५ अब्ज रुपये (१६ दशलक्ष पौंड) किमतीचा करार मोडण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या एका मुलाखतीनंतर क्लबने हा निर्णय घेतला आहे. युनायटेडची कायदेशीर टीम रोनाल्डोच्या ९० मिनिटांच्या मुलाखतीचे पुनरावलोकन करेल ज्यामध्ये त्याने प्रशिक्षक एरिक टेन हाग आणि क्लबवर टीका केली आहे.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा पाहा कधी, कुठे, कसा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

युनायटेडने कराराचा भंग केल्याबद्दल रोनाल्डोवर खटला भरण्यासाठी वकील नियुक्त केले आहेत. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोने फिफा विश्वचषकाच्या काही दिवस आधी त्याच्या क्लब मँचेस्टर युनायटेडवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. रोनाल्डोने असा दावाही केला की क्लबमधील काही ज्येष्ठ लोक त्याला ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर युनायटेडचे ​​होम ग्राउंड) येथे पाहू इच्छित नाहीत. ही मुलाखत समोर आल्यानंतर मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. क्लबने ठरवले आहे की ते रोनाल्डोवर १० लाख पौंड (सुमारे ९.५५ कोटी) दंडाची मागणी करणार आहेत. प्रसिद्ध पत्रकार पियर्स मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि आपला राग काढला.

हेही वाचा :   “त्याला कर्णधार बनवण्याचे म्हणजे…” हार्दिक पांड्याबाबत सलमान बट्टचे वादग्रस्त विधान

या मोसमात रोनाल्डोला क्लबच्या अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सुरुवातीच्या इलेव्हनमध्येही स्थान मिळाले नाही. तो अनेक सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून खेळला. रविवारी फुलहॅमविरुद्ध रोनाल्डोलाही संघाबाहेर ठेवण्यात आले होते. संघाने हा सामना २-१ असा जिंकला.

Story img Loader