महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत माणगंगा संघाच्या मल्लांनी आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. माणगंगाच्या उमाजी शिरतोडे, बापू कोळेकर आणि प्रकाश कोळेकर यांनी प्रतिस्पध्र्यावर मात करत अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. कामगार केसरी गटात उमाजीबरोबर संग्राम पोळ, संदीप पाटील, सरदार सावंत यांनी विजय मिळवले.
अन्य गटांतील विजेते :
५५ किलोपर्यंत : विकास लोणकर (कृष्णा सहकारी), निलेश पाटील (कुंभी कासारी). ६० किलोपर्यंत : दीपक कांबळे (कुंभी कासारी), सागर धनगर (दत्त सहकारी), निलेश मादळे (छत्रपती शिवाजी), भारत पाटील (कुंभी कासारी). ६६ किलोपर्यंत : अमित कारंडे (कुंभी कासारी), दत्तात्रय कुलावमोडे (मेजर आनंद घाडगे), क्रांतीकुमार पाटील (श्रीराम दुध). ७४ किलोपर्यंत : नितीन सकपाळ (यशवंत ग्लुकोज), संग्राम चाबुक (कुंभी कासारी), प्रीतम पाटील (वसंतदादा सहकारी), रवींद्र पाटील (तात्यासाहेर कोरे सहकारी).

Story img Loader