Manish Narwal Won Silver Paris Paralympics Games 2024: भारताच्या पॅरा अ‍ॅथलीट्सने एकामागून एक पदकांची रांग लावली आहे. भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी सलग चौथ पदक जिंकलं आहे. भारताचा नेमबाज मनीष नरवालने भारतासाठी चौथे पदक जिंकले आहे. १० मीटर एअर पिस्तूलच्या नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.

मनिष नरवालने पुरुषांच्या P1 १० मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकले. मनीष नरवाल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये त्यांचे दुसरे सुवर्णपदक २.५ गुणांच्या फरकाने हुकले. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या जो जोंगडूने सुवर्णपदक जिंकले. चीनच्या यांग चाओने कांस्यपदक जिंकले.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

हेही वाचा – Paris Paralympics 2024: पॅरा ॲथलीट प्रीति पालने १०० मी शर्यतीत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिला भारतीय खेळाडू

मनीष नरवालने रौप्यपदक जिंकण्यापूर्वी दक्षिण कोरियाच्या जो जोंगडूला कडवी टक्कर दिली. २२ वर्षीय मनीष नरवाल बराच काळ आघाडीवर होता, परंतु खराब गुणांमुळे तो मागे पडला आणि दक्षिण कोरियाचा अनुभवी नेमबाज जो जोंगडूने आघाडी घेतली. भारतीय पिस्तुल नेमबाज शिवा नरवालचा मोठा भाऊ मनिष नरवाल याने २३४.९ तर जोंगडूने २३७.४ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनच्या यांग चाओने २१४.३ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा –

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ४ पदकं जिंकली आहेत. नेमबाजीमध्ये तीन पदकं (अवनी लेखरा (सुवर्णपदक), मनीष नरवाल आणि मोना अग्रवाल (कांस्यपदक) आणि एक पदक ट्रॅक इव्हेंटमध्ये पूजा पाल हिने पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये पूजा पालने पदक जिंकून इतिहास रचला. .

कोण आहे मनिष नरवाल (Who is Manish Narwal?)

मनीष नरवाल हा जन्मत:च उजव्या. हे त्याच्यासाठी हृदयद्रावक होते. पण, हळूहळू तो खेळाडू बनण्याच्या ध्येयात यशस्वी झाला. त्याने अलीकडेच सांगितले की, जेव्हा तो पहिल्या वर्गात सर्व मुलांसोबत बसला होता तेव्हा तो इतर मुलांपेक्षा वेगळा होता. त्याच्या उजव्या हातामध्ये समस्या होती. हे कळल्यावर तो खूप रडायचा. त्याला लोकांसमोर यायलाही भीती वाटत होती.

मनीष नरवाल जन्म १७ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला. त्याच्या उजव्या हातात लहानपणापासूनच समस्या होती. कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले पण मनीषचा हात बरा करण्यात त्यांना यश आले नाही. मनीषला कळायला लागल्यापासून त्याचे पहिले प्रेम फुटबॉल होते. मनीष नरवालला फुटबॉल खेळाची आवड होती. त्याने फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहिले परंतु शारीरिक विकृतीमुळे तो त्याचे करिअर म्हणून निवड करू शकला नाही. यानंतर आई-वडिलांच्या पाठिंब्याने जवळच्या मित्राच्या सूचनेनुसार त्याने नेमबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक राकेश ठाकूर यांनी त्याला बल्लभगडमध्येच नेमबाजीचे प्रशिक्षण दिले.

मनीष नरवालकने पॅरा नेमबाजी स्पर्धांमध्ये अनेक पदकांची कमाई केली आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात निर्णायक क्षण २०२१ पॅरा नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आला, जेव्हा त्याने P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 स्पर्धेत २२९.१ च्या जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने सर्बियाच्या रास्तको जोकिकचा २२८.६ गुणांचा जागतिक विक्रम मोडला.