नवी दिल्ली : युवा आघाडीपटू मनीषा कल्याण ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली आहे. ती सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसीकडून खेळली.

मनीषाने मारिलेना जॉर्जिओयूच्या जागी ६०व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच हा विक्रम आपल्या नावे केला. ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या लढतीत अपोलोन संघाने लॅट्वियातील आघाडीचा क्लब एसएफके रिगाला ३-० असे पराभूत केले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

मनीषाने राष्ट्रीय संघासह भारतीय महिला लीगमध्ये गोकुलम केरळ संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. तिला २०२१-२२ वर्षांसाठी ‘एआयएफएफ’ सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ब्राझील संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यात मनीषाने गोल झळकावत सर्वाचे लक्ष वेधले होते. विदेशी क्लबकडून कराराबद्ध करण्यात आलेली मनीषा ही दुसरी भारतीय खेळाडू आहे. याआधी डांगमेइ ग्रेसला उझबेकिस्तानच्या एफसी नसाफने करारबद्ध केले होते.