Manoj Tiwari shared a special video on his 10th wedding anniversary: पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री आणि भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी १८ जुलै २०२३ रोजी त्यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केला. त्यानी पत्नी सुष्मिता रॉय यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. देशासाठी १२ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळलेल्या मनोज तिवारीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून ते त्याच्या पत्नीसोबत पूलमध्ये वेळ घालवण्यापर्यंतचे क्षण दाखवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनोज तिवारीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पत्नी सुष्मितासाठी एक हृदयस्पर्शी संदेशही लिहिला आहे. मनोज तिवारीने लिहिले की, “प्रेमात पडणे सोपे आहे, परंतु प्रेम टिकवून ठेवणे खूप आनंददायी आहे. प्रेमाने भरलेल्या दशकाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाइफ पार्टनरला १० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

मनोज तिवारीच्या पोस्टवर लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही खूप सुंदर कपल आहात, जे एकमेकांना पूरक आहात. एकमेकांशी एकनिष्ठ रहा आणि तुम्ही आयुष्यभर एकत्र राहाल! इतरही अनेकांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Team India: ‘माझा कोणी मित्र नाही…’, भारतीय संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना

मनोज तिवारीने फेब्रुवारी २००८ मध्ये भारतासाठी एकदिवसीय आणि ऑक्टोबर २०११ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आहेत. यात त्याचे शतकही (नाबाद १०४) आहे. एकदिवसीय सामन्यातही त्याने ५ बळी घेतले आहेत. त्याने ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, परंतु या फॉरमॅटमध्ये तो केवळ १५ धावा करू शकला. त्याला या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.