Manoj Tiwari’s Retirement from Cricket: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज मनोज तिवारीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून त्यानी निवृत्तीची घोषणा केली आहे. तो पश्चिम बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिला आहे. मनोज तिवारी बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. २०१५ मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. मनोज तिवारीने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट –

मनोज तिवारीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या वडिलाप्रमाणे असेलेले कोच मानवेंद्र घोष क्रिकेटच्या प्रवासात आधारस्तंभ आहेत. ते नसते तर मी क्रिकेट विश्वात कुठेही पोहोचलो नसतो. धन्यवाद साहेब. तुमची प्रकृती ठीक नाही. मी तुम्हाला जलद पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो. माझ्या वडिलांचे आणि आईचे आभार. त्याने माझ्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कधीही दबाव आणला नाही, उलट मला क्रिकेटमध्ये राहण्यासाठी प्रोत्साहन दिले.’

पत्नी सुष्मिता रॉय आणि सहकाऱ्यांचेही आभार मानले –

मनोज तिवारी यांनी पत्नी सुष्मिता रॉय आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. मनोज तिवारी यांनी लिहिले, ‘माझ्या पत्नी सुष्मिता रॉयचे अनेक आभार. माझ्या आयुष्यात आल्यापासून तिने मला नेहमीच साथ दिली आहे. तिच्या सततच्या पाठिंब्याशिवाय मी आज जीवनाच्या या टप्प्यावर पोहोचलो नसतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांना (माजी आणि सध्याचे) आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि असोसिएशनच्या सर्व सदस्यांना ज्यांनी माझ्या प्रवासात भूमिका बजावली.’

हेही वाचा – Team India: केएल राहुलने फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सुरु केला सराव, पाहा VIDEO

चाहत्यांचे आभार मानताना मनोज तिवारीने लिहिले की, ‘मी क्रिकेट चाहत्यांचा उल्लेख कसा करू शकत नाही. ज्यांनी माझ्या चढ-उताराच्या काळात मला यश मिळवून दिले आणि आजच्या जगात मला क्रिकेट लीजेंड बनवले. माझ्या हृदयाच्या तळापासून खूप खूप धन्यवाद. मी येथे नमूद करणे चुकले असेल तर कृपया माझी माफी स्वीकारा. जीवनाच्या उद्देशाच्या शोधात. धन्यवाद क्रिकेट.’

मनोज तिवारीने आपल्या कारकिर्दीत ४९३ क्रिकेट सामने खेळले –

मनोज तिवारीने आपल्या कारकिर्दीत सुमारे १९ हजार धावा केल्या आणि १०० हून अधिक बळी घेतले. मनोज तिवारीने १४१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९९०८ धावा आणि ३२ विकेट्स, १६९ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५५८१ धावा आणि ६३ बळी आणि १८३ टी-२० सामन्यांमध्ये ३४३६ धावा आणि ३४ बळी घेतले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांच्या नावे अनुक्रमे २८७ आणि १५ धावा आहेत. मनोज तिवारीनेही एकदिवसीय सामन्यात ५ विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj tiwarys social media post retirement from all formats of cricket vbm