नवी दिल्ली : स्पेनच्या मानोलो मार्क्वेझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) क्लब एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदही कायम राखणार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘एआयएफएफ’च्या कार्यकारी समितीची शनिवारी बैठक झाली आणि यात नवे प्रशिक्षक म्हणून मार्क्वेझ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ५५ वर्षीय मार्क्वेझ यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली असली, तरी २०२४-२५ हंगामासाठी ते एफसी गोवा संघालाही मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, आगामी हंगामानंतर ते केवळ भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यावर लक्ष केंद्रीत करतील, असे ‘एआयएफएफ’ने सांगितले.

‘‘कार्यकारी समितीच्या बैठकीत सर्वप्रथम राष्ट्रीय संघाचे नवे प्रशिक्षक नेमण्याबाबत चर्चा करण्यात आली. यात मानोलो मार्क्वेझ यांचे नाव निश्चित करण्यात आले. ते आतापासूनच प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील,’’ असे ‘एआयएफएफ’च्या निवेदनात नमूद करण्यात आले. मार्क्वेझ यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही.

हेही वाचा >>>Team India : गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये मॉर्ने मॉर्केलसह ‘या’ चार माजी दिग्गजांची लागू शकते वर्णी, जाणून घ्या कोण आहेत?

भारतीय संघाला २०२६च्या विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्यानंतर इगोर स्टिमॅच यांची १७ जून रोजी प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मार्क्वेझ २०२० सालापासून भारतात प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी प्रथम हैदराबाद एफसी क्लबला (२०२०-२३) मार्गदर्शन केले. या काळात हैदराबाद संघाने ‘आयएसएल’ चषक पटकावला होता. मार्क्वेझ यांनी २०२३ मध्ये हैदराबाद संघ सोडून गोवा एफसीचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. भारतात येण्यापूर्वी मार्क्वेझ यांनी स्पेनमधील प्रतिष्ठेची स्पर्धा ‘ला लिगा’मध्ये लास पाल्मास क्लबचे प्रशिक्षकपद भूषवले. तसेच त्यांनी लास पाल्मास ‘बी’, इस्पानयॉल ‘बी’, बादालोना, प्राट आणि युरोपा अशा संघांना मार्गदर्शन केले आहे.

भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या देशाला मी माझे दुसरे घर मानतो. भारतात आल्यापासून या देशाने आणि देशवासीयांनी मला खूप प्रेम दिले आहे. आता भारताला आणि फुटबॉल संघाच्या लाखो चाहत्यांना आनंद देण्याचा माझा प्रयत्न राहील. – मानोलो मार्क्वेझ