Manu Bhaker Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने नेमबाज मनू भाकेर व तिच्या आईची भेट घेतली. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओनंतर सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरू झाली. पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोपानंतर नीरज एका कार्यक्रमात दिसला, जिथे मनू आणि तिची आई देखील उपस्थित होते. मनू भाकेर, तिची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलत होते, यावरून मनू आणि नीरजच्या नात्यावर चर्चा सुरू होती.
हेही वाचा – VIDEO: “माझी अशी इच्छा आहे की…” मनू भाकेरच्या आईने नीरजचा हात स्वत:च्या डोक्यावर ठेवला अन् चर्चांना आलं उधाण
मनू भाकेरची आई आणि नीरज चोप्रा एकमेकांशी संवाद साधत होते, तेव्हा तिच्या आईने नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवत त्याला काहीतरी मनवताना दिसल्या. तर काही वेळाने नीरज मनूशी गप्पा मारताना दिसला. जिथे तिची आईदेखील आजूबाजूला होती. मनूची आई आणि मनू नीरजसोबत व्हीडिओमध्ये बोलताना दिसल्यानंतर अनेकांनी या व्हीडिओवर रिश्ता पक्का अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या. तेव्हापासूनच नीरज आणि मनूच्या नात्याची चर्चा सुरू होते. अनेकांनी असे सुचवले की नीरज आणि मनूचे लग्न होऊ शकते. यावर मनूच्या वडिलांनी वक्तव्य केले आहे.
हेही वाचा – Neeraj Chopra: नीरज चोप्रा ऑलिम्पिकनंतर भारतात परतण्याऐवजी जर्मनीला रवाना, नेमकं काय आहे कारण?
मनू भाकेरच्या वडिलांचे नीरज-मनूच्या नात्यावर वक्तव्य
मनू भाकेरचे वडील राम किशन यांनी दैनिक भास्करला सांगितले की, “मनू अजूनही खूप लहान आहे. ती लग्नाच्या वयाचीही नाही. आत्ता त्याबद्दल विचारही करत नाही आहोत. मनूची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते,” असे वक्तव्य देत मनूच्या बाबांनी नीरज आणि मनूच्या नात्यासंबंधित अफवांना फेटाळून लावले आहे.
नीरज चोप्राचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी मनू भाकेर आणि नीरज चोप्राच्या नात्याच्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेचे पूर्णपणे नाकारली आहे. ते म्हणाले की, “नीरजने ज्या प्रकारे पदक आणले होते, त्याबद्दल सर्व देशवासियांनाही माहिती झाली. लग्नाच्या वेळीही असेच होईल, लोकांना नीरज कधी आणि कोणासोबत लग्न करतोय याची माहिती मिळेल.”
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू आणि नीरज हे दोन सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू होते. मनूने एकेरी आणि सांघिक नेमबाजी स्पर्धांमध्ये दोन कांस्यपदके जिंकली, तर नीरजने पॅरिसमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.