Manu Bhaker grandmother and uncle die in road accident: भारताची स्टार नेमबाज मनू भाकेर हिला दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांच्या घरात एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. मनू भाकेरची आजी आणि मामाचा रस्ता अपघातात दुःखद मृत्यू झाला आहे. नेमका काय प्रसंग घडला, जाणून घ्या.

चरखी दादरी येथील महेंद्रगड बायपास रोडवर मनूची आजी आणि मामा दोघेही स्कूटरवरून जात असताना एका वाहनाने (ब्रेझा कार) त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर धडक देणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला.

Cement mixer and taxi accident on Borivali Western Expressway taxi driver died
येवला तालुक्यातील दोन अपघातात चालकाचा मृत्यू, दोन जण जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Bhayandar, laborer died, suffocation , sewage tank,
भाईंदर : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून एका कामगाराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी
Chhatrapati sambhajinagar loksatta news
छत्रपती संभाजीनगर : प्रेमप्रकरणातून बहिणीला डोंगरावरून ढकलले; तरुणीचा मृत्यू

हेही वाचा – INDW vs WIW: भारताच्या लेकींची टी-२० वर्ल्डकपमध्ये दणक्यात सुरूवात, २६ चेंडूतच जिंकला पहिला सामना; वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत. मनु भाकेर हिला दोन दिवसांपूर्वी १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न देऊन सन्मानित केले होते. पण या आकस्मित घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा – भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ

मनूचे मामा युद्धवीर सिंग हे हरियाणा रोडवेजमध्ये ड्रायव्हर होते आणि आज सकाळी ते स्कूटीवरून ड्युटीसाठी निघाले होते. मनूची आजी सावित्री देवीही त्यांच्याबरोबर होती, त्यांना त्यांच्ा लहान मुलाच्या लोहारू चौकातील घरी जायचे होते, त्यामुळे तिनेही त्यांच्यासह स्कूटरवर जायचं ठरवलं. दोघेही कालियाणा वळणावर येताच चुकीच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या ब्रेझा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मनू भाकेर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मनूचे मामा युधवीर यांचे वय ५० वर्षे आणि आजी सावित्री देवी यांचे वय ७० वर्षे असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – PAK vs WI: पाकिस्तानने अवघ्या दोन दिवसांत मुल्तान कसोटीत वेस्ट इंडिजला चारली धूळ, फिरकीपटूंच्या खात्यात सर्व विकेट

मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. प्रथम तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आणि नंतर तिने सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यानंतर, ऑलिम्पिक स्पर्धेच्या एका मोसमात भारतासाठी दोन पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली.

Story img Loader