Manu Bhaker Ramp Walk Video Viral : मनू भाकेरला खेळाच्या मैदानावर झेंडा गाडताना आणि व्यासपीठावर पदक घेताना तुम्ही पाहिले असेलच, पण भारताची ही स्टार नेमबाज आता मॉडेलिंगमध्ये उतरली आहे. नेमबाजीत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मनू भाकेर आता रॅम्प वॉकमध्ये मॉडेल्स मागे टाकताना दिसत आहे. आता तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करून सर्वांची मने जिंकली आहेत. तिच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मनू भाकेरचा रॅम्प वॉक व्हिडीओ व्हायरल –

आजवर नेमबाजीत आपली ताकद दाखवणाऱ्या मनू भाकेरने मॉडेलिंगमध्येही चमक दाखवली आहे. वास्तविक मनू भाकेर शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान मनू भाकेर रॅम्प वॉक करताना दिसली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅम्प वॉक करताना मनू भाकेर किलर लूकमध्ये दिसत आहे, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मनू भाकेरने काळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला आहे, जो लोकांना आकर्षित करत आहे. तिने ड्रेसवर ग्रीन जॅकेट घातले आहे, जे तिच्या लुकमध्ये आणखी भर घालत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

मनू भाकेरच्या रॅम्प वॉकने जिंकली चाहत्यांची मनं –

मनू भाकेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मनू भाकेर खूपच सुंदर दिसत आहे. फॅशन वीकमध्ये मनू भाकेरच्या सौंदर्याने आणि शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. या फॅशन शोमध्ये मनू भाकेर सुंदर आणि आधुनिक आउटफिट्समध्ये दिसली. जे खास या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. यानंतर मनू भाकेरने फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मनु भाकेर म्हणाली की, हा अनुभव खूपच अप्रतिम होता, मात्र, मी घाबरली होती. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – PAK vs ENG : इंग्लंडविरुद्धचा लाजिरवाणा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी, पीसीबीने ‘या’ बाबतीत केला मोठा बदल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी –

वास्तविक मनू भाकेरने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. या २२ वर्षीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली होती आणि असे करणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली आणि एकमेव खेळाडू आहे. मनूने १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या यशानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढली आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ‘BGT मध्ये आग लावायची आहे…’, चाहत्याच्या विधानानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO

केंद्र सरकारने ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्त केले –

केंद्र सरकारने नुकतीच युवा स्टार भारतीय नेमबाज मनू भाकेरची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक मनू भाकेरचे वडील भारतीय नौदलात आहेत. तिचे वडील राम किशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता आहेत. मनू भाकेरने सार्वजनिक मंचावर अनेकदा याचा उल्लेख केला आहे. तिने अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते की, त्यांनी आपला बराच वेळ समुद्रातील जहाजांमध्ये घालवला आहे.

Story img Loader