Manu Bhaker Reaction on Neeraj Chopra Post: डायमंड लीग २०२४ मध्ये नीरज चोप्रा अवघ्या एका सेंटीमीटरमुळे दुसऱ्या स्थानावर राहिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही असेच काहीसे घडले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही गोल्डन बॉय नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधाना मानावे लागले. या दोन्ही स्पर्धांमध्ये नीरजला दुखापतींचा सामना करावा लागला. नीरजने डायमंड लीग स्पर्धेनंतर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला ऑलिम्पिकपासून चर्चेत असलेल्या मनू भाकेरने नीरज चोप्रासाठी खास मेसेज दिला आहे. तिने नीरज चोप्रासाठी एक खास पोस्ट केली असून दुखापतीतून तो लवकरात लवकर ठिक व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – India vs China Hockey: चेहऱ्यावर मास्क अन् हातात चीनचा झेंडा, हॉकी फायनलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा चीनला पाठिंबा

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
items lost in a rickshaw, Thane , rickshaw Thane,
ठाण्यात रिक्षेत विसरलेला दीड लाखांचा ऐवज प्रवाशांना परत

मनु भाकर हिने नीरजने शेअर केलेल्य पोस्टवर प्रतिक्रिया दिली. नीरजने डायमंड लीग स्पर्धेत त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीबद्दल आणि एक्स रे चा फोटो शेअर करत माहिती दिली आहे. नीरजने यंदाच्या सीझनमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले. मनू भाकेरने या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले, “२०२४ च्या शानदार सीझनसाठी नीरज तुझे अभिनंदन. तू दुखापतीतून लवकरात लवकर बरा व्हावा आणि येत्या काळात तुला खूप यश मिळो हीच सदिच्छा.”

हेही वाचा – India vs China Hockey: भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास, चीनचा पराभव करत पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विक्रमी पाचवं जेतेपद

नीरज चोप्रा देखील पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान दुखापतीमुळे त्रस्त होता. असे असतानाही तो रौप्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरला. रविवारी त्याने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावत १० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. नीरज २०२४ मध्ये तीनदा मोठ्या स्पर्धांमध्ये दुसरे स्थान पटकावले.

मनू भाकेरने १० आणि २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान मनू भाकेरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यातील संवाद पाहून मनू भाकेर आणि नीरज चोप्राच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकेर हे एकमेकांशी बोलतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला होता. यानंतर नीरज आणि मनू यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू होत्या. पण दोघांच्याही घरच्यांनी ही बातमी नाकारली. पण आता नीरजच्या पोस्टवर मनू भाकेरच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

Story img Loader