Manu Bhaker Statement After Final Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये शनिवारी (३ ऑगस्ट) संपूर्ण भारतासह स्टार नेमबाज मनू भाकेरचे देशासाठी अजून एक पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यापूर्वीच दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकेरची हॅटट्रिक हुकली. अगदी एका गुणासाठी मनूला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. या अंतिम फेरीनंतर मनू भाकेरने जिओ सिनेमासह संवाद साधला, तेव्हा थोडी निराश आणि भावूक झालेली पाहायला मिळाली.
हेही वाचा – Manu Bhakerची ऑलिम्पिकमध्ये अद्वितीय कामगिरी, पदकाची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पण तरीही रचला इतिहास
महिलांच्या २५ मीटर नेमबाजी स्पर्धेत पदक गमावल्यानंतर मनूने मुलाखत दिली. जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीला उत्तर देताना ती भावूक झाली. मनूला अगदी एका अंकासाठी मागे राहिल्याने पदकापासून लांब राहावे लागले. त्यामुळे बोलताना मनूला भरून येत होतं, असं तिच्या आवाजावरून वाटलं. मात्र, मनूने कॅमेऱ्यात अश्रू ढळू दिले नाहीत आणि मुलाखत पूर्ण केली. ती म्हणाले की, चौथ्या स्थानी मी राहिली जी फार चांगलं नाही.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 8 : दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत दाखल, तिरंदाजीमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या
Manu Bhaker: मनू भाकेर फायनलनंतर काय म्हणाली?
मनू भाकेर म्हणाली, “फायनलमध्ये मी दडपणाखाली होती. मी शूटऑफच्या वेळेस खूप दडपणाखाली होती. मी शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला. माझं सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुरेस नव्हतं. “मला दोन पदके मिळाली याचा मला आनंद आहे, पण आत्ता… चौथ्या स्थानी येऊन फारसं चांगलं वाटत नाहीय.
हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्टहेही वाचा –
मनू भाकेरने आतापासूनच २०२८ च्या लॉस एंजेलेस ऑलिम्पिकचा मनात विचार सुरू केला, म्हणाली, “माझा सामना संपल्यावर मी स्वतला सांगितलं ठीके काही हरकत नाही, पुढच्या वेळेस पूर्ण करू. मी तुम्हाला समोर दिसते पण पडद्यामागे खूप जणांची मेहनत आहे. माझ्यासोबत अनेकांनी मेहनत घेतली आहे. खूप छान प्रवास होता. OGQ, SAI, PM मोदी जी, जसपाल सर, मित्रमंडळी, कुटुंबीयांचे आभार… मी कृतज्ञ आहे, मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, खूप सारं प्रेम. पुढच्या वेळी कदाचित आम्ही अधिक चांगली कामगिरी करू. आईसाठी एक मेसेज म्हणजे तू केलेल्या सर्व त्यागांसाठी धन्यवाद.” मनू भाकेर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत दोन ऑलिम्पिक कांस्य पदकांसह मायदेशी परतणार आहे.