Manu Bhaker Statement on Coach Jaspal Rana: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी २ कांस्यपदक जिंकून इतिहास घडवणारी मनू भाकेर सध्या खूप चर्चेत आहे. मनू भाकेरच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिला सोशल मीडिया अकाउंटवर फॉलो करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तिचे प्रत्येक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. नुकतेच नीरज चोप्रा आणि तिच्याबद्दलही चर्चा झाली. यावर तिने समोर येत स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते. दरम्यान, मनू आणि तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचं बॉन्डिंग कसं आहे. यावर तिने मत मांडले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

पीटीआयने मनू भाकेरची मुलाखत घेतली. यादरम्यान तिने आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारांबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी तिने आपल्या प्रशिक्षकांबद्दल सांगितले की, ते (जसपाल राणा) माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत आणि ही विश्वासाची बाब आहे, तु्म्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवता. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही गोष्टीबद्दल शंका येते तेव्हा ते मला प्रोत्साहन देतात. ते कदाचित मला दोन कानशिलात पण लगावतील आणि सांगतील की तू हे करू शकतेस, तू यासाठीच प्रशिक्षण घेतले आहेस.

हेही वाचा – Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल

मनू भाकेर कोचबद्दल नेमकं काय म्हणाली?

मनूच्या या वाक्यावर तिचे प्रशिक्षक यांनी तिला अडवले. तर मनूने आपले म्हणणे स्पष्ट केले आणि म्हटले – कानशिलात लगावतील म्हणजे खरंच मारतील असं नाही. मी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते मला प्रोत्साहन देतात आणि जेव्हा मी एखादी गोष्ट करायला कचरत असेन तर ते मला धैर्य देतात. ते म्हणतील की तू यासाठीच प्रशिक्षण घेत आहेस आणि नक्कीच तू चांगली कामगिरी करू शकाल.

हेही वाचा – Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल

प्रशिक्षक जसपाल राणा म्हणाले की, आम्ही १४ महिन्यांपूर्वी सरावाला सुरुवात केली होती. माझ्या बाजूने एकच अट होती की आपण भूतकाळातील कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही. ही एक नवीन सुरुवात असेल आणि आपण पुढे जाऊ. चांगली गोष्ट म्हणजे ही अट आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. माझे काम फक्त मनू भाकेर यांना मार्गदर्शन करणे आहे. हे फक्त कोचिंग नाही तर या स्तरावर आल्यानंतर कोणत्याही खेळाडूला लक्ष्य कसे साधायचे किंवा ट्रिगर कसे खेचायचे हे शिकवले जात नाही. मनू भाकेरला निराशेपासून किंवा अतिआत्मविश्वासापासून वाचवणे एवढेच त्यांचे काम होते.

टोकियो ऑलिम्पिक २०२० नंतर मतभेदांमुळे मनू भाकेर आणि जसपाल राणा यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यानंतर मनू भाकेरने वर्षानुवर्षे वेगळे प्रशिक्षण घेतले. पण पॅरिस ऑलिम्पिकला जाण्यापूर्वीच मनूने जसपाल राणांची मदत घेतली आणि त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला पोहोचले. यानंतर मनू भाकेरने भारतासाठी २ कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला.