अॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत भारताला या खेळात एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आलेले नाही. या खेळात ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता पुणे जिल्ह्य़ातील खेळाडूंमध्ये आहे. हे लक्षात घेऊनच येथून ऑलिम्पिकपटू घडवण्याचे स्वप्न साकारण्यासाठी युनिक स्पोर्ट्स अकादमीची निर्मिती झाली. गेली १८ वर्षे खेळाडू घडवण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेमधून २०२०च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू घडेल, असा आत्मविश्वास या संघटकांना आहे.
अॅथलेटिक्स खूप खर्चीक नसला तरी जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षण आदी गोष्टींची नितांत आवश्यकता असते. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, आदी खेळांकरिता प्रायोजक भरपूर मिळत असतात. त्या तुलनेत अॅथलेटिक्सकरिता अपेक्षेइतके प्रायोजक पुढे येत नाहीत. हे लक्षात घेऊनच १९९९मध्ये काही पालकांनी एकत्र येऊन युनिक स्पोर्ट्स अकादमीची स्थापना केली. खो-खो या क्रीडा प्रकारात अखिल भारतीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय पाटणकर यांनी या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांना सुरुवातीच्या काळात कालिंदी आगाशे यांनी कनिष्ठ गटातील खेळाडूंना मार्गदर्शन क रण्याची जबाबदारी स्वीकारत मदत केली. एकही पैसा न घेता या दोन्ही प्रशिक्षकांनी मार्गदर्शनाचे कार्य केले आहे. प्रारंभी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर या खेळाडूंचा सराव असे. गेले काही वर्षे बाबुराव सणस मैदानावर हे खेळाडू सराव करीत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नामुळे या खेळाडूंना जिमकरिता जागा उपलब्ध झाली आहे.
साधारणपणे १४ वर्षांवरील ३० ते ३५ मुले-मुली दररोज सकाळी चार तास व सायंकाळी साडेचार तास सराव करीत असतात. स्पर्धात्मक सरावाबरोबरच पूरक व्यायाम, तंदुरुस्ती, आदीचाही ते सराव करतात. आजपर्यंत या संस्थेमधून १० ते १५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत २५हून अधिक खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे, तर कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत २०हून अधिक खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापैकी काही खेळाडूंना पदकांचीही कमाई झाली आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत १० खेळाडू तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४ खेळाडू चमकले आहेत. ५-६ खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रमही नोंदवले आहेत. राज्य स्पर्धेत ४०हून अधिक खेळाडूंनी तर जिल्हा स्पर्धेत ५०हून अधिक खेळाडूंनी भाग घेत भरपूर पदके जिंकली आहेत. या खेळाडूंना डॉ. अभिषेक देव, डॉ. कश्मिरा सबनीस, आदी तज्ज्ञांचेही मार्गदर्शन मिळत आहे.
आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात कार्य करीत असणाऱ्या संस्थेला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. युनिक अकादमीकडे स्वत:च्या मालकीचे मैदान नाही ही त्यांची मोठी अडचण आहे. सणस मैदान हे महानगरपालिकेच्या मालकीचे असल्यामुळे सतत खेळाडूंवर टांगती तलवार असते. या मैदानावर कुस्ती, कबड्डी स्पर्धाबरोबर अन्य काही कार्यक्रमही आयोजित केले जातात. अशा वेळी अॅथलेटिक्सच्या सरावात काही प्रमाणात अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे येथील कृत्रिम ट्रॅकही आता जुना झाला आहे. साहजिकच त्याबाबतही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खेळाडूंची वाढती संख्या असली तरी त्या प्रमाणात त्यांना मार्गदर्शन करणारे नि:स्वार्थी वृत्तीचे प्रशिक्षकही मिळत नाहीत. हीदेखील महत्त्वाची समस्या आहे.
अॅथलेटिक्सच्या प्रेमापोटी बँकेच्या नोकरीचा त्याग
संजय पाटणकर हे राष्ट्रीयीकृत बँकेस नोकरी करीत होते. बँकेची नोकरी सांभाळून ते काही वर्षे प्रशिक्षण करीत असत. मात्र विविध स्पर्धासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचे म्हटले की नोकरी व प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी सांभाळणे अवघड वाटू लागले. त्यामुळेच त्यांनी तीन वर्षांपूर्वी नोकरीला रामराम ठोकला व पूर्णवेळ सरावासाठी झोकून दिले. खो-खो खेळत असतानाच ते मैदानी स्पर्धेतही भाग घेत असत. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सुरेश गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असताना आपणही अॅथलेटिक्सच्या मार्गदर्शनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळेच त्यांनी २० वर्षांपूर्वी अॅथलेटिक्सच्या प्रशिक्षणास सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी
प्रतीक निनावे, सिद्धी हिरे, मानसी पर्वतकर, अनीष जोशी, तन्वी शानबाग, सायली द्रवीड, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती भाग्यश्री शिर्के, आदी खेळाडूंनी जागतिक शालेय, राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, आशिया चषक स्पर्धा आदी विविध स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
शालेय स्तरावर नैपुण्यशोध करणार -घाग
‘‘सध्या आमच्याकडील बहुतेक खेळाडू महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणारे आहेत. पुणे आणि परिसरात या खेळासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. त्या दृष्टीने आम्ही शालेय स्तरावर नैपुण्य शोध सुरू केले आहे. अकादमीतर्फे विविध गटांच्या स्पर्धा आयोजित करीत त्याद्वारे ५० मुले व ५० मुलींची निवड करीत त्यांना प्रशिक्षण देणार आहोत, असे अकादमीचे मानद सचिव रोहित घाग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘स्पर्धात्मक सरावाबरोबरच या खेळाडूंना फिजिओ, वैद्यकीय तज्ज्ञ, क्रीडा मानसतज्ज्ञ, मसाजिस्ट, आहारतज्ज्ञ आदी सुविधाही देणार आहोत. ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना आम्ही परदेशातही प्रशिक्षणासाठी पाठवत आहोत. सिद्धी हिरेला जमैकातील रेसर्स फील्ड क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आली आहे. सिद्धीबरोबरच प्रतीक निनावे, मानसी पर्वतकर यांच्याकडे ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्याची क्षमता आहे.’’
उसेन बोल्टकडून कौतुक
जमैकामध्ये अॅथलेटिक्ससाठी विपुल नैपुण्य आहे व तेथील प्रशिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळेच युनिक अकादमीने तेथील रेसर्स फील्ड क्लबबरोबर प्रशिक्षणाबाबत करार केला आहे. सिद्धी हिरेकडील नैपुण्य व कौशल्य पाहून उसेन बोल्ट या ऑलिम्पिक विजेत्याने तिचे कौतुक केले आहे.