सध्याच्या घडीला व्यायामशाळा फार फोफावलेल्या दिसतात. पण काही वर्षांपूर्वीं अशी परिस्थिती नव्हती. काही निवडक व्यायामशाळा होत्या. शाळेतला एखादा मुलगा व्यायामशाळेत जातो, असं फार कमी पाहायला मिळायचं. त्याचं कारणंही तसं होतं. त्यावेळी मुलं बऱ्याचदा मैदानावर खेळताना आपण पाहायचो. विविध मैदानी खेळांमध्ये ते रमायचे. त्या खेळांच्या माध्यमातून आपसूकच व्यायाम व्हायचा, त्यामुळे व्यायामशाळेची गरज फारशी भासायची नाही. पण आता मैदानंच उरली नाहीत, तर मुलं खेळणार कुठे? त्यांचा व्यायाम होणार कसा? या साऱ्या प्रश्नांना उत्तर मिळालं आहे ते ‘चिल्ड्रन्स जिम’ या नावानं.
सध्याच्या या युगात पालक नोकरी किंवा व्यवसाय करतात. तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की, मोबाईल किंवा लॅपटॉपवर कोणताही खेळ खेळता येतो. आजची पिढी त्यामध्येच रमते. पण त्यामुळे शरीराला चालना मिळत नाही. ‘‘आम्ही क्रिकेट, फुटबॉल सर्व खेळ खेळतो, पण मोबाईलवर!’’ असं ऐकायला मिळायला लागलं आणि पालकांचीही चिंता वाढायला लागली आणि ‘चिल्ड्रन्स जिम’ हा त्यावरचा रामबाण उपाय त्यांना पटला. ‘चिल्ड्रन्स जिम’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांमध्ये रूढ आहे. पण भारतात याबद्दल फारसे कुणाला माहीत नाही. व्यायामशाळा म्हटलं की, डम्बेल्स, रॉड्स, प्लेट्स असं सारं तुमच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं असेल. या लहान मुलांना हे सारं उचलायला लावायचं म्हणजे अघोरीच प्रकार, असं म्हणाल. पण जरा थांबा. ही संकल्पना समजावून घ्या.
खेळ, नृत्य, योगा या साऱ्या गोष्टींचा माध्यमातून शरीर सुदृढ करण्याचा प्रयत्न करणं, हे या व्यायामशाळांचं मुख्य ध्येय आहे. मुलांना विविध खेळांमध्ये गुतंवलं जातं, त्यासाठी त्यांना काही वेळा पारितोषिकंही दिली जातात. सहा महिन्यांपासून ते १३ वर्षांपर्यंत मुला-मुलींसाठी या खास प्रकारच्या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. आता सहा महिन्यांच्या मुलांना या व्यायामशाळेत घेऊन जाणं, धोक्याचं नाही का? असं तुम्हाला वाटेलही. पण त्याची काळजी घ्यायला पालकांसह काही प्रशिक्षकही तिथे असतात. प्रत्येक मुलगा नेमकं काय करतो, याकडे लक्ष दिलं जातं. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं योग्य राखता येईल, हे या व्यायामशाळांमध्ये पाहिलं जातं. त्यामुळे मोबाईलच्या मायाजाळापासून मुलांना दूर करण्यासाठी ही व्यायामशाळा उपयुक्त ठरताना दिसत आहे.
या व्यायामशाळांची संकल्पना पचनी पडायला काही जणांना कठीणही जाईल. पण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक ही गोष्ट आत्मसात करण्यासाठी सरसावले आहेत. पण ज्यांच्या मुलांना मैदानात खेळायला मिळतं, त्यांना या व्यायामशाळेत पाठवून काहीही साध्य होणार नाही, हेही तितकंच खरं. पण ज्यांना मिळत नसेल त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य ठरू शकतो.
‘चिल्ड्रन्स जिम’ म्हणजे तुमच्या डोळ्यांसमोर जी व्यायामशाळा उभी राहते, तशी ही नक्कीच नाही. सध्या मैदानं नसल्याने मुलांना खेळता येत नाही, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आम्ही ही संकल्पना रुजवायला सुरुवात केली. सध्याच्या घडीला आमच्याकडे जवळपास १५०० मुलं आहेत. या साऱ्यांसाठी आम्ही वयानुसार विशेष खेळांचा आराखडा बनवतो आणि त्यामध्ये त्यांची कामगिरी कशी होते, यावर लक्ष ठेवतो. सध्याच्या शाळेतल्या मुलांनाही लठ्ठपणासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते किंवा त्यांची तंदुरुस्ती चांगली असल्याचे दिसत नाही. त्यांच्यासाठी ही व्यायामशाळा फायद्याची ठरू शकते. खेळ, योगा आणि नृत्य या तीन गोष्टींवर आम्ही प्रामुख्याने भर देतो. गेल्या वर्षभरात आम्हाला चांगले निकाल पाहायला मिळत असून भविष्यात या व्यायामशाळेला चांगली मागणी असेल, असा मला विश्वास आहे. – सृष्टी गुप्ता, पॉवरहाऊस व्यायामशाळेच्या प्रमुख (सांताक्रुझ)
लहान मुलं हात-पाय हलवतात, तोदेखील एक व्यायामच आहे. सध्या ८० टक्के मुलं ही मैदानात खेळायला जात नाही. त्यामुळे त्यांची तंदुरुस्ती चांगली राहत नाही. ‘चिल्ड्रन्स जिम’ म्हणजे तिथे जाऊन वजन उचलायचे नसते, हे आधी समजून घ्यायला हवे. ‘चिल्ड्रन्स जिम’मुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. सध्या शाळेच्या दप्तरांचे ओझे किती असते, हे साऱ्यांनाच माहिती आहे. ते उचलण्यासाठी तरी मुलं तंदुरुस्त असायला हवीत. जर मूल शारीरिक तंदुरुस्त असेल तर त्याची मानसिकताही चांगली राहते. त्यांचा आहारही चांगला होतो. अभ्यासात चांगले लक्ष लागते. लहानपणापासून व्यायाम करायची सवय लागली तर व्यसनांपासून मुलांना लांब राहता येऊ शकते. ‘चिल्ड्रन्स जिम’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशातली असली तरी ती आपल्याकडच्या लोकांनी समजून घेतली तर त्यांच्या मुलांसाठी हे नक्कीच फायद्याचे ठरेल. –राजेश सावंत, तंदुरुस्ती मार्गदर्शक
साधारणत: वयाच्या आठव्या वर्षांपासून व्यायाम सुरू केला तर चालू शकतो. पण या ‘चिल्ड्रन्स जिम’च्या माध्यमातून नव्या गोष्टी साऱ्यांना पाहायला मिळत आहे. सहा महिन्यांच्या मुलाला या व्यायामशाळेत नेमकं काय शिकवले जाऊ शकतं, हे समजत नाही. माझ्या मते लहान मुलांवर कोणतेही दडपण आणता कामा नये. त्यांना जे खेळावंसं वाटतं ते त्यांना खेळायला द्यायला हवं. या व्यायामशाळेत त्यांना खेळायला दिलं जातं, ही चांगली बाब आहे. पण त्यानंतर काय? याचाही विचार करायला हवा. सरतेशेवटी तुमच्या मुलाला नेमकं काय करायचं आहे, याचा विचारही करायला हवा. खेळण्यामुळे तंदुरुस्ती वाढते, पण कोणत्या खेळात कारकीर्द घडवायची आहे, याचे भान पालकांना असायला हवे. –डॉ. रौनक होसाबेटू, मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाचे फिजिओ.