भारतीय कुस्ती व बेशिस्तपणा याचे अतूट नाते आहे. ज्या मातीने आपल्याला नावलौकिक दिला, चरितार्थाचे चांगले साधन दिले, त्याच मातीमध्ये आपण बेशिस्तीचे दर्शन घडवतो. याहून दुसरे दुर्दैव कोणतेही असू शकत नाही. या बेशिस्त व बेजबाबदारपणामुळेच महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांना साता समुद्रापलीकडे यश मिळत नाही. पुण्यात नुकत्याच झालेल्या हिंद केसरी अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत त्याचाच प्रत्यय आला.

हिंदू केसरी स्पर्धेला भारतीय शैली विभागाच्या कुस्ती क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चाहत्यांना अव्वल दर्जाच्या लढतींपेक्षा भाषणबाजी व विनाकारण विलंबाने झालेल्या कुस्त्यांमुळे होणारा विरसच पाहायला मिळाला. कुस्ती संघटकांच्या सुदैवाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टसारखे भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले. मात्र त्यांच्या मदतीने कुस्त्यांची शान वाढवण्याऐवजी संघटक व मल्लांच्या पाठीराख्यांनी बेशिस्तपणाचे ओंगळवाणे दर्शनच घडवले.

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
BJP president Chandrashekhar Bawankule , Congress president Nana Patole, asrani, sholay film
“नाना पटोले सध्या शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

कुस्तीची कोणतीही स्पर्धा असली तरी एखाद्या संयोजकांच्या हातात माइक आला की तो भाषणबाजी करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अगदी प्रेक्षकांनी कंटाळल्यामुळे टाळय़ा वाजवल्या तरीही तो हातातील माइक सोडत नाही. उपस्थित असलेल्या २०-२५ नामवंतांची नामावली म्हटल्यानंतरच तो भाषणबाजीला सुरुवात करतो. साहजिकच प्रेक्षक नकारात्मक टाळय़ा किंवा शिट्टय़ा वाजवल्यानंतर तो माइक खाली ठेवतो. त्याचप्रमाणे कुस्त्यांचे धावते वर्णन करण्यासाठी हौशी कलाकारही तेथे असतो. तो सतत बडबडत असताना अनेक वेळा प्रत्यक्ष कुस्तीच्या आखाडय़ापाशी असलेल्या पंचांना लढतींसाठी मल्लांचा पुकार करताना या हौशी समलोचकाचा खूपच अडथळा येत असतो. मात्र या हौशी समालोचकाला गप्प बसवणे, हे त्यांच्या मर्यादेच्या बाहेर असते. हिंदू केसरी स्पर्धेत हेच चित्र पाहायला मिळाले.

हिंद केसरी स्पर्धेतील उपांत्य फेरीत किशन कुमार व महाराष्ट्राचा अभिजित कटके यांची लढत होती. या लढतीत पहिल्या टप्प्यात अभिजित २ गुणांनी पिछाडीवर होता. नंतरच्या टप्प्यात बरोबरी झाल्यावर त्याच्या पाठीराख्यांनी या लढतीची वेळ संपण्यापूर्वीच आखाडय़ात प्रवेश करीत अभिजितला खांद्यावर घेतले. त्याचे अन्य काही पाठीराखेही आनंदाने तेथे जल्लोष करू लागले. या पाठीराख्यांमध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेत्या नामवंत पहिलवानांचा समावेश होता. किशन कुमारच्या प्रशिक्षकांनी पंचांकडे दाद मागत या लोकांना आखाडय़ाबाहेर जाण्यास सांगितले. तांत्रिक अधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिलवानांकडून अशी बेशिस्त अपेक्षित नव्हती. ही लढत अभिजितने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

अंतिम फेरीसाठी तीन वेळा पुकार करूनही अभिजित आखाडय़ात पोहोचला नव्हता. ही कुस्ती लावण्यासाठी प्रमुख पाहुणे आखाडय़ात उपस्थित झाले तरी त्याचा पत्ता नव्हता. सहसा कोणत्याही लढतीच्या वेळी तीन वेळा पुकारा करून खेळाडू उपस्थित राहिला नाही तर त्याला बाद ठरवण्यात येते. मात्र या नियमाचे येथे पालन करण्यात आले नाही. महाराष्ट्राच्या मल्लांना शिस्त लावायची असेल तर अशा नियमांचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अंतिम लढत सायंकाळी ७ वाजता आयोजित केली जाणार होती, मात्र किशन व अभिजित यांच्यातील उपांत्य फेरीची लढत ७ वाजता सुरू झाली. अंतिम कुस्ती सुरू होण्यासाठी प्रेक्षकांना आणखी सव्वादोन तास वाट पाहावी लागली.

कुस्तीगिरांना आर्थिक मदतीसाठी सतत संघटक शासनापुढे विनवण्या करीत असतात. प्रत्यक्षात हेच संघटक फेटे, नारळ, हारतुरे व शाली आदी कारणास्तव हजारो रुपये खर्च करीत असतात. आजकाल फेटय़ांचे भाडेशुल्कही दिवसाला दोन-अडीचशे रुपयांच्या खाली नाही. उद्घाटन व सांगता समारंभाच्या वेळी शंभर लोकांचे असे सत्कार झाले तर त्यासाठी किमान पाचआकडी खर्च होत असतो. याच पैशात काही गरीब, परंतु होतकरू मल्लांचा एक महिन्याचा खर्च निघू शकतो. दुर्दैवाने कुस्ती संघटकांना असे सत्कार केल्याखेरीज चैन पडत नाही. एकीकडे कुस्तीला राजाश्रय नाही म्हणून बोंबाबोंब करायची आणि स्पर्धेनिमित्त अनेक वायफळ कारणास्तव हजारो रुपयांची उधळण करायची ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धाकरिता पुण्यात शिवाजी स्टेडियम, कात्रज येथील मामासाहेब मोहोळ संकुल आदी अनेक संकुले बांधण्यात आली आहेत. सणस मैदानावरील अ‍ॅथलेटिक्सच्या कृत्रिम ट्रॅकवर अशा स्पर्धा घेण्याऐवजी स्वत:च्या घरच्या संकुलांमध्ये हिंदकेसरी स्पर्धा घेणे अधिक उचित ठरले असते. जरी ट्रॅकचे फारसे नुकसान झाले नसले तरी या स्पर्धेच्या वेळी तेथे निवास असलेल्या खेळाडूंच्या भोजनव्यवस्थेमुळे तेथे दोन-तीन दिवस दरुगधी सुटली होती. त्याचा त्रास तेथे सराव करणाऱ्या खेळाडूंना झाला याचा कोणीच विचार करीत नाही. आपली संकुले कुस्ती स्पर्धाविना धुळीची कोठारे होत असतात याचा विचार या संघटकांनी केलेला नाही. आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते सात-आठ मल्ल या मातीतून तयार करणार आहोत असे गेली २५ वर्षे हेच संघटक सांगत आले आहेत. वायफळ खर्चाऐवजी खेळाडूंच्या विकासावरच खर्च केला तरच एखादा ऑलिम्पिकपटू या मातीतून घडू शकेल. पदक मिळवणे हे तर महाराष्ट्रातील मल्लांसाठी मृगजळासारखेच आहे.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com