नियमित व्यायाम हीच यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. हेच तत्त्व डोळ्यांसमोर ठेवत गेल्या १०-१२ वर्षांमध्ये दररोज धावण्याचा व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवारी मिनी मॅरेथॉन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या हौशी लोकांना एकत्र आणून त्यांना धावण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान देण्याचे काम ‘पुणे रनिंग’ ही संस्था करीत आहे. त्यांचे कार्य पुणे शहरापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राबाहेरही पोहोचले आहे.
शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी अनेक जण जरी नियमित धावण्याचा व्यायाम करीत असले तरी काही वेळा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला किंवा क्षमतेपेक्षा जास्त वेळ धावत राहिला तर असा व्यायाम अंगलटी येऊ शकतो. तसेच धावताना केव्हा वेग वाढवायचा व केव्हा कमी ठेवायचा, चढावावर किंवा उतरणीवर कशी धाव घ्यायची, हे अनेक हौशी लोकांना माहीत नसते. सुधीर हरीभट, महेश नारकर, संदीप कोलटकर, प्रीती अरवडे, राकेश मेहता, सुधीर दरोडे, निखिल शहा व विकास कुमार या वेगवेगळ्या क्षेत्रांतील मंडळींनी नागरिकांमध्ये नियमित धावण्याची व त्याद्वारे निरोगी जीवन ठेवण्याची आवड निर्माण करण्याच्या उद्देशानेच २००७मध्ये ‘पुणे रनिंग’ संस्था स्थापन केली. सुरुवातीला केवळ दोन आकडी सदस्य असलेल्या या संस्थेचे सध्या ३० हजारांहून अधिक सदस्य झाले आहेत. त्यामध्ये पुण्याबरोबरच मुंबई, अहमदनगर, जळगाव, बंगळूरु, दिल्ली, जम्मू, श्रीनगर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आदी अनेक ठिकाणी या संस्थेचे कार्यकर्ते हौस म्हणून नवोदित धावपटूंना मार्गदर्शन करीत आहेत.
इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आदी देशांमधील काही हौशी खेळाडू त्यांना जमेल, तेव्हा भारतात येऊन या संस्थेच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. परदेशातील काही खेळाडू दृक्श्राव्य तंत्राद्वारेदेखील प्रशिक्षण घेत असतात. सशक्त नागरिक व खेळाडू बनवण्याच्या कार्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. नियमित व्यायामावरील व क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक ही आरोग्यावर होणाऱ्या खर्चामध्ये अप्रत्यक्षरीत्या कपात करण्यास मदत करीत असते, हाच त्यामागचा हेतू आहे.
अद्ययावत संकेतस्थळ
संस्थेचे सभासद देशाच्या कानाकोपऱ्याबरोबरच परदेशातही असल्यामुळे त्यांना वेळोवेळी अद्ययावत माहिती देण्यासाठी संस्थेने स्वत:ची संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यावर दररोज खेळाडूंना आहार, वेगवेगळी पूरक औषधे, व्यायामाचे विशेषत: धावण्याचे आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती दिली जात असते. या संकेतस्थळाला भरपूर प्रतिसाद मिळत असतो.
नियमित धावण्यामुळे आजारावरही मात
‘पुणे रनिंग’च्या उपक्रमात कर्करोग, मेंदूचे विकार झालेल्यांचा सहभाग असतो. नियमित व नियोजनबद्ध धावण्याचा व्यायाम केल्यामुळे त्यापैकी अनेकांनी आजारपणावर मात केली आहे. एवढेच नव्हे, तर हे लोक अर्धमॅरेथॉन किंवा मॅरेथॉनमध्येही सहभागी होत आहेत.
सामाजिक बांधिलकी
‘पुणे रनिंग’ ही संस्था जरी लोकांमध्ये सुदृढ शरीर निर्माण करण्याचे कार्य करीत असली तरी त्यांचे कार्य तेवढय़ापुरते मर्यादित राहिलेले नाही. समाजाचे ऋण फेडण्यासाठी ही संस्था अनेक समाजोपयोगी कार्य करीत आहेत. ‘नन्ही कली’ या उपक्रमांतर्गत कुपोषित व दुर्लक्षित मुलींचे संगोपन करण्याचा वसा त्यांनी उचलला आहे. १२ राज्यांमध्ये हे काम चालत असून त्याद्वारे दीड लाखांहून अधिक मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे. त्यासाठी या संस्थेचे १५००हून अधिक कार्यकर्त्यांनी शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले आहे व हे कार्यकर्ते शिक्षक म्हणून काम करीत असतात. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानातही त्यांचे काम सुरू असते. ‘पुणे रनिंग’च्या विविध शर्यतींमध्ये उद्योग, शासकीय आस्थापनांमधील लोकांचा सहभाग असतो. हीच मंडळी त्यांना सामाजिक कार्याकरिता सढळ हाताने मदत करीत असतात.
तंत्रशुद्ध व नियोजनबद्ध प्रशिक्षण
कोणत्याही नवोदित धावपटूने थेट मॅरेथॉनमध्ये उतरणे आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे ‘पुणे रनिंग’ संस्थेने प्रत्येक शनिवार व रविवारी पुणे शहरात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. सुरुवातीला एक किलोमीटर, नंतर तीन किलोमीटर, पाच किलोमीटर अंतराचा सराव करीत मॅरेथॉनमध्ये कसे धावायचे, हे या केंद्रांमध्ये शिकवले जात आहे. या दोन दिवसांबरोबरच एकूणच आठवडय़ाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम कसा पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, पूरक व्यायाम कसा पाहिजे आदी र्सवकष प्रशिक्षण दिले जात आहे. त्याकरिता विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली जात आहे. या केंद्रांमध्ये महाराष्ट्राबाहेरचे खेळाडूही शनिवार व रविवारी येत असतात. प्रत्येक खेळाडूची प्रगती कशी होत आहे, याची माहिती दर आठवडय़ाला दिली जात असते. तो कोठे कमी आहे व अजून काय करायला पाहिजे, याचीही माहिती दिली जाते.
शर्यतींचे नीटनेटके आयोजन
संस्थेतर्फे दर शनिवार व रविवारी कमी अधिक अंतराच्या शर्यतींचे आयोजन केले जात असते. पुण्यात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये बऱ्याच वेळा व्यावसायिक खेळाडूंचे वर्चस्व असल्यामुळे हौशी खेळाडूंची खूपच कुचंबणा होत असते. त्यामुळेच ‘पुणे रनिंग’ संस्थेतर्फे गेली पाच-सहा वर्षे ‘पुणे रनिंग बियाँड मायसेल्फ’ ही मॅरेथॉन शर्यत सुरू केली आहे. गतवर्षी त्यामध्ये १२ हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. मुख्य मॅरेथॉनबरोबरच ३, ५, १०, २१ किलोमीटर अंतराच्या शर्यतीही आयोजित केल्या जात असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपली धावण्याची क्षमता किती आहे, याची कल्पना येऊ शकते. या शर्यतींमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि खेळाडूंनाही वाहनांचा त्रास होणार नाही असाच मार्ग निवडला जात असतो. शर्यत संपल्यानंतर प्रत्येक खेळाडूची वैद्यकीय तपासणी केली जाते. तसेच धावण्याचा त्याच्या श्वासोच्छ्वासावर किती व कसा परिणाम झाला आहे. त्याच्या हृदयाच्या ठोक्यात काही बदल झाला आहे का, इतकी अद्ययावत माहिती लगेच खेळाडूला दिली जाते. याचप्रमाणे विजयी खेळाडूंबरोबरच सर्वच खेळाडूंना तत्परतेने पदक, प्रमाणपत्रही दिले जात असते. त्यामुळेच या शर्यतींवर प्रेम करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या शर्यतींच्या संयोजनासाठी पाचशेहून जास्त स्वयंसेवक अनेक दिवस कार्यरत असतात, तेही हौसेखातरच. प्रत्यक्ष शर्यतीच्या दिवशीही तेवढेच स्वयंसेवक मार्गावर उभे राहून शर्यत यशस्वी करण्यासाठी मदत करतात.