विश्वचषक हे एकच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून खेळाडू मैदानात उतरतात आणि त्यासाठी कोणताही त्याग करायला ते तयार असतात. ब्राझीलचा बचावपटू मार्सेलोच्या आजोबांचे शनिवारी निधन झाले, पण कोसळलेल्या या दु:खापेक्षा मार्सेलोने संघाच्या सरावाला प्राधान्य दिले आहे.
प्रेडो व्हिइआयरा डा सिल्व्हा यांचे रिओ दी जानिरो येथे शनिवारी निधन झाले, ते ७८ वर्षांचे होते. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील जिंकल्यानंतर काही तासांनी मार्सेलोच्या आजोबांची प्राणज्योत मालवली. प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी मार्सेलोला घरी जाण्याची परवानगी दिली होती, पण त्याने संघाबरोबर राहणेच पसंत केले.
आजोबांच्या मृत्यूच्या दु:खावर मात करून मार्सेलोचे सरावाला प्राधान्य!
विश्वचषक हे एकच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून खेळाडू मैदानात उतरतात आणि त्यासाठी कोणताही त्याग करायला ते तयार असतात. ब्राझीलचा बचावपटू मार्सेलोच्या आजोबांचे शनिवारी निधन झाले, पण कोसळलेल्या या दु:खापेक्षा मार्सेलोने संघाच्या सरावाला प्राधान्य दिले आहे.
First published on: 07-07-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marcelo stays in brazil camp despite grandfathers death