Women’s Premier League 2023 Updates: ४ मार्चपासून भारतीय महिला क्रिकेटचे नवे पर्व सुरू होत आहे. वर्षानुवर्षे बीसीसीआयचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम ४ ते २६ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. क्रिती सॅनन, कियारा अडवाणी यांसारख्या सेलिब्रिटी उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. डब्ल्यूपीएल २०२३ च्या साखळी सामन्यातील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या दोन स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. महिला प्रीमियर लीगमधील कोणत्या संघांमध्ये किती सामने होणार आहेत आणि तुम्ही हे सामने कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

गुजरात आणि मुंबई यांच्यात सलामीचा सामना –

या स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे, तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व बेथ मुनीकडे आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

हे सितारे परफॉर्म करणार –

महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक स्टार्स फिल्मी तडका देण्यास तयार आहेत. डब्ल्यूपीएल २०२३ च्या उद्घाटन समारंभात पंजाबी-कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लन, गायक शंकर महादेवन, कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन सादर करणार आहेत.

डब्ल्यूपीएल २०२३ चा उद्घाटन समारंभ कधी होणार?

महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन समारंभ ४ मार्च रोजी सामन्याच्या दोन तास आधी साडेपाच वाजता सुरू होईल.

डब्ल्यूपीएल २०२३ चा उद्घाटन सोहळा तुम्ही कुठे पाहू शकता?

स्पोर्ट्स १८ चॅनलवर तुम्ही डब्ल्यूपीएल २०२३ चा उद्घाटन सोहळा पाहू शकता.

डब्ल्यूपीएल २०२३ उद्घाटन समारंभाचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?

डब्ल्यूपीएल २०२३ च्या उद्घाटन समारंभाचे लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमा अॅपवर पाहू शकता.

डब्ल्यूपीएल २०२३ मध्ये हे पाच संघ सहभागी होत आहेत –

१.यूपी वॉरियर्स
२.गुजरात जायंट्स
३.मुंबई इंडियन्स
४.रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५.दिल्ली कॅपिटल्स

गुजरात जायंट्स स्क्वॉड: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन, सबिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबमन शकील.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाच्या पराभवानंतर पुजाराने जिंकली मने; एक षटकार ठरला लाख रुपयाचा, पाहा VIDEO

मुंबई इंडियन्स स्क्वॉड: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा खाजी, सोनामका यादव, जिंतामणी कलिता, नीलम बिश्त

Story img Loader