दक्षिण आफ्रिकेचा उंचपुरा गोलंदाज मार्को यान्सन आणि पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यात बाचाबाची झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चेन्नईत सुरू असलेल्या वर्ल्डकप लढतीदरम्यान यान्सनने रिझवानला उद्देशून शेरेबाजी केली. यानंतर रिझवानने स्मितहास्य करत जादू की झप्पी अर्थात आलिंगन देण्यासाठी हात फैलावले.
सहाव्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. दोन निर्धाव चेंडू टाकल्यानंतर यान्सनने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला बाद केलं. यानंतर रिझवानने यान्सनच्या गोलंदाजीवर थर्डमॅनच्या दिशेने चौकार वसूल केला. रिझवानच्या आक्रमक पवित्र्याने चिडलेल्या यान्सनने त्याला उद्देशून शेरेबाजी केली. षटकातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर यान्सन पुन्हा रिझवानच्या दिशेने गेला. त्याने पुन्हा टिप्पणी केली. रिझवानने खेळभावनेचं उदाहरण दाखवताना यान्सनच्या दिशेने आलिंगनाची खूण केली.
रिझवानने २७ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. गेराल्ड कोइटझेच्या उसळत्या चेंडूवर पूलचा फटका मारताना बाद झाला.
पाकिस्तान सर्वबाद २७०; आझम-सौदची अर्धशतकं
कर्णधार बाबर आझम, सौद शकील यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर पाकिस्तानने २७० धावांची मजल मारली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक या सामन्यातही मोठी खेळी करु शकले नाहीत. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जमली. रिझवान स्थिरावलाय असं वाटत असतानाच गेराल्ड कोइटझेच्या उसळत्या चेंडूवर बाद झाला. रिझवानने ३१ धावा केल्या.
इफ्तिकारने बाबरला साथ दिली. तबरेझ शम्सीने इफ्तिकारला बाद करत ही जोडी फोडली. संथ आणि कूर्मगती अर्धशतकानंतर बाबर बाद झाला. त्याने ६५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. सौद शकील आणि शदाब खान जोडीने सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. कोइटझेने शदाबला केशव महाराजकडे झेल देण्यास भाग पाडलं. शदाबने ३६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. सौद शकील अर्धशतकानंतर फटकेबाजी करणार असं वाटत असतानाच शम्सीने त्याला माघारी धाडलं. सौदने ५२ धावांची खेळी केली. मोहम्मद नवाझने २४ धावा करत धावफलक हलता ठेवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ तीनशे धावांचा टप्पा ओलांडणार असं चित्र होतं पण दक्षिण आफ्रिकेने वेसण घातली. पाकिस्तानचा डाव ४६.४ षटकात २७० धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने ४ तर मार्को यान्सनने ३ विकेट्स घेतल्या.