अमेरिकन ओपन विजेता अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मरे याने आठव्या मानांकित रिचर्ड गास्केट याचे आव्हान ६-७ (३-७), ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. तृतीय मानांकित खेळाडू फेरर याने पंधराव्या मानांकित टॉमी हास याची अनपेक्षित विजयाची मालिका ४-६, ६-२, ६-३ अशी खंडित केली. मरे व फेरर या दोन्ही खेळाडूंनी पहिला सेट गमावल्यानंतर सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवित विजयश्री खेचून आणली. मरे याने २००९ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते.   

Story img Loader