माजी रशियन टेनिस चॅम्पियन मारिया शारापोव्हा आणि सात वेळा फॉर्म्युला वन रेसिंग वर्ल्ड चॅम्पियन मायकेल शूमाकर यांच्या नावाने एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरोधात बुधवारी गुडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवली गेली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पाचे संचालक आणि इतर विकासकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील छत्तरपूर मिनी फार्म येथील रहिवासी असलेल्या शफाली अग्रवाल या महिलेनं तक्रारीत म्हटलंय की,   तिने आणि तिच्या पतीने सेक्टर ७३ येथील शारापोव्हाच्या नावावर असलेल्या प्रकल्पात ३,६५० चौरस फूटाचे निवासी अपार्टमेंट बुक केले होते. तक्रारीत, तिने असा आरोप केला आहे की फर्मच्या संचालकांनी त्यांच्या स्वप्नातील आलिशान घराच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. कारण त्यांना ते घर मिळालंच नाही.

महिलेनं शारापोव्हाचा संदर्भ देत, पुढे सांगितले की, “एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेनिसपटूने इतर आरोपींसाठी जाहिरात करून सामान्य लोकांच्या नजरेत या प्रकल्पाचे समर्थन केले आणि तिचा फोटो या प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्या माहितीपत्रकात आहे. तिने खोटी आश्वासने दिली आणि खरेदीदारांसोबत डिनर पार्ट्या केल्या आणि गेल्या सात वर्षांत कधीही सुरू न झालेल्या प्रकल्पासाठी हे सर्व केले गेले. तसेच, जाहिराती आणि माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे मायकल शूमाकर वर्ल्ड टॉवर नावाचा एक टॉवर बांधण्यात येणार होता.”

तक्रारदार महिलेलने आरोप केला आहे की शारापोव्हाने सही केलेली प्रोजेक्टची एक प्रत तिच्याकडे आहे. शारापोव्हाने बांधकाम साइटला भेट दिली होती आणि टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. “शारापोव्हा आणि शूमाकर यांच्या नावाने गृहनिर्माण प्रकल्पाची जाहीरात करण्यात आली आणि लोक त्यांच्यापासून प्रभावित झाले,” असे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेनं सांगितलं की तिने या घरासाठी ७९ लाख रुपये भरले होते. परंतु वारंवार विनंती करूनही आरोपींनी तिच्यासोबत करार केला नाही. आपण राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे संपर्क साधला, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि नंतर कोर्टाने बुधवारी पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

बादशाहपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ दिनकर म्हणाले, “न्यायालयाच्या निर्देशानुसार, सीआरपीसीच्या कलम १५६ (३) अंतर्गत, एफआयआर नोंदवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.”  

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maria sharapova and michael schumacher names figure in fir filed in gurgaon hrc