संघर्षपूर्ण लढतीत पेट्रा क्विटोव्हावर विजय मिळवत मारिया शारापोव्हाने बीजिंग खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतरचे शारापोव्हाचे यंदाच्या वर्षांतील हे दुसरे जेतेपद आहे. शारापोव्हाने हा सामना ६-४, २-६, ६-३ असा जिंकला. या जेतेपदासह शारापोव्हा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाने वर्चस्व गाजवले. दुसऱ्या सेटमध्ये क्विटोव्हाने ताकदवान फोरहँडच्या फटक्यांद्वारे सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये शारापोव्हाने नेटजवळून सुरेख खेळ करत सामना जिंकला.

Story img Loader