शरीरातून मेलडोनियम बाहेर पडण्यास निश्चितपणे किती कालावधी लागतो या संदर्भात ठोस माहिती नसल्याने मेलडोनियमचे सेवन केल्याप्रकरणी दोषी खेळाडूंना शिक्षा न करण्याचा जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेचा (वाडा) विचार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास  टेनिसपटू मारिया शारापोव्हासह असंख्य क्रीडापटूंवरचा बंदीच्या शिक्षेचा डाग दूर होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘हृदयविकार आणि मधुमेह यांच्यावरील उपचारांमध्ये मेलडोनियमचा उपयोग केला जातो. क्रीडापटू कामगिरी उंचावण्यासाठी वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले, मात्र हे द्रव्य शरीरातून कधी उत्सर्जित होते, याविषयी सखोल माहिती नसल्याने दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या सुनावणीदरम्यान सर्वसमावेशक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल,’’ असे वाडाने स्पष्ट केले.