जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतून माघार घेतली आहे, असे स्पध्रेचे संचालक डेव्हिड ब्रेवर यांनी जाहीर केले.
वर्षांतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असे बिरूद मिरविणारी अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. फ्लशिंग मेडोजच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पध्रेसाठी गुरुवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
‘‘उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मारियाने अमेरिकन खुल्या स्पध्रेत खेळणार नसल्याचे आम्हाला कळवले आहे. ती लवकर बरी व्हावी आणि पुढील वर्षी न्यूयॉर्कमध्ये तिचा खेळ पाहण्याची आम्हाला संधी मिळावी,’’ अशी अपेक्षा ब्रेवर यांनी प्रकट केली.
खांद्याच्या दुखापतीमुळे शारापोव्हाची माघार
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतून माघार घेतली आहे, असे स्पध्रेचे संचालक डेव्हिड ब्रेवर यांनी जाहीर केले.
First published on: 23-08-2013 at 06:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maria sharapova pulls out of us open due to shoulder injury