‘‘टेनिस खेळाची ठोस अशी मूल्यव्यवस्था आहे. समाजातील अनेकांसाठी विशेषत: लहान मुलांसाठी क्रीडापटू हे अनुकरणीय असतात. क्रीडापटूंकडून गैरवर्तन झाल्यास त्याचे विपरीत परिणाम उदयोन्मुख युवा पिढीच्या मनावर होऊ शकतात. चूक झाल्यास शिक्षा होते हे बिंबवण्यासाठी उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या मारिया शारापोव्हाला शिक्षा होणे योग्यच आहे,’’ असे मत अव्वल टेनिसपटू राफेल नदालने व्यक्त केले.

तो पुढे म्हणाला, ‘‘शारापोव्हाच्या बाबतीत जे झाले, त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. तिने जाणीवपूर्वक असे केलेले नाही. पण तिच्याकडून दुर्लक्ष झाले हे निश्चित. त्यासाठी तिला शिक्षा व्हायला हवी.’’

Story img Loader