नावात काय आहे असं शेक्सपीअर म्हणाला होता. पण नावातच सर्व काही असतं, याचा प्रत्येकाला वेगळा अनुभव येत असतो. नुकतीच पुन्हा एकदा याची प्रचिती आली. आगामी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिने आपलं आडनाव ‘शुगरपोव्हा’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर शारापोव्हा स्पर्धेसाठी जपान आणि चीनला जाणार आहे. अचानक नाव बदलल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं मॅक्सने म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका पाठवताना शारापोव्हानं आपलं मूळ नावाच कायम ठेवल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.
शारापोव्हाने स्वत:ची एक कंपनी सुरू केली असून त्याद्वारे जवळपास १.८ मिलियन गोड पदार्थांच्या पिशव्याचे उत्पादन करण्यात येते. मागच्या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणावर विकल्या गेलेल्या पिशव्यांवर ‘फ्लर्टी’, ‘सॅसी’ आणि ‘स्मित्तेन’ अशी लेबल्स आहेत. शारापोव्हाने ‘शुगरपोव्हा’ या नावाने कँडी आणि च्युईंगगम बाजारात आणलं आहे. या ब्रँडच्याच प्रसारासाठी ती आपलं नाव शुगरपोव्हा करण्याच्या विचारात होती.
मारिया शारापोव्हा ही मूळची रशियाची असली तरी अमेरिकेची रहिवासी आहे. त्यामुळे आगामी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी ती आपलं आडनाव बदलून घेण्याचा तिचा विचार होता. त्यासाठी तिने फ्लोरीडा येथील सर्वोच्च न्यायालयात चौकशीचा अर्जही दाखल केला होता. मात्र, कायदेशीरदृष्ट्या असे करायचे असल्यास शारापोव्हाला ग्रॅण्ड स्लॅम कमिटीचीही परवानगी आवश्यक आहे. तसेच असा बदल केल्यास त्याची कल्पना स्टेडियम अनाऊंसर्स, पंच यांना देणे आवश्यक असते. एवढंच नव्हे तर, स्कोरकार्डवर ‘मिस शुगरपोव्हा’ किंवा ‘एम. शुगरपोव्हा’ यापैकी काय झळकणार याबाबतही कळवायला लागले असते. या सर्व तांत्रिक बाबींमुळे शारापोव्हाने हा विचार सोडून दिला असल्याची माहिती तिचा एजंट मॅक्स आयसेनबडने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा