क्रिकेटविश्वात आपल्या संयमी आणि शैलीदार खेळीने विश्वविक्रमी इतिहास रचणाऱया सचिनच्या वृत्तीतील संयमीपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला.
“टेनिसपटू मारिया शारापोव्हा क्रिकेट पाहत नसावी. त्यामुळे ती मला ओळखत नसेल, तर यात आश्चर्यकारक काहीच नाही आणि अपमान वाटण्यासारखे तर मुळीच नाही अशी संयमी प्रतिक्रिया सचिनने दिली.
कोण सचिन तेंडुलकर?; मारिया शारापोव्हाचा सवाल
विम्बल्डन स्पर्धेदरम्यान, टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिने सचिनला ओळखत नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर क्रिकेटप्रेमी दुखावते होते. सोशल नेटवर्कींग आणि इतर माध्यमांतून संतापाच्या प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमींनी दिल्या होत्या. परंतु, शारापोव्हाच्या या वक्तव्यावर सचिनने एका मुलाखतीत स्मित हास्य करत ती मला ओळखत नाही, यात अपमानजनक काहीच नसल्याची संयमी प्रतिक्रिया देत मनाचा मोठपणा दाखवून दिला.
सचिनच्या चाहत्यांची शारापोव्हावर टीका
शारापोव्हा ओळखत नाही यात अपमानास्पद काहीच नाही- सचिन
क्रिकेटविश्वात आपल्या संयमी आणि शैलीदार खेळीने विश्वविक्रमी इतिहास रचणाऱया सचिनच्या वृत्तीतील संयमीपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला.
First published on: 23-07-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maria sharapovas comments not disrespectful says sachin